टोकियो ऑलिम्पिक : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने अभिमानास्पद कामगिरी करून सुवर्णपदक जिंकून दिले. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या ऍथलिटने सुवर्णपदक जिंकले आहे. वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्रा नंतर नीरज दुसरा भारतीय ठरला. THE THROW THAT WON #IND […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले, भालाफेकमध्ये रचला इतिहास
टोकियो ऑलिम्पिक : भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. आज, ऑलिम्पिकच्या 16 व्या दिवशी भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा पूर्ण झाल्या. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले. नीरज चोप्राने इतिहास रचला भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या ऍथलिटने सुवर्णपदक जिंकले आहे. वैयक्तिक […]
ब्रेकिंग : युवा अकाली दलाचे नेते विक्रमजीत सिंह मिडदुखेरा यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या
मोहाली : युवा अकाली दलाचे नेते विक्रमजीत सिंह मिडदुखेरा उर्फ विक्की मिडदुखेरा यांची शनिवारी सकाळी मोहालीच्या सेक्टर 71 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. विकी मिडदुखेरा यांच्यावर मोहाली येथे अज्ञात सशस्त्र लोकांनी गोळीबार केला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, विक्की मिडदुखेरा सकाळी 10.30 च्या सुमारास सेक्टर 71 मधील मातौर मार्केटमधील एका प्रॉपर्टी […]
धक्कादायक! 17 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अत्याचार
यवतमाळ : शाळेतून घरी परतणाऱ्या १७ वर्षीय तरुणीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २८ जुलैला आर्णी तालुक्यातील जवळा येथे ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोनही आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी पीडित १७ वर्षीय तरुणी शाळेतून घरी परतत होती, त्यावेळी दोन तरुणांनी या विद्यार्थीनीला […]
कस्तुरबा रुग्णालयात गॅसची गळती, मोठा अनर्थ टळला
मुंबई : कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅसची गळती झाली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गॅसची गळती नेमकी कशामुळं झाली?, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाहीये. सकाळी ११च्या दरम्यान एलपीजी गॅसची गळती झाल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णालय प्रशासनाला याबाबत माहिती दिली. दरम्यान, रुग्णालयाने तातडीने रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवलं […]
जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला भारतात मिळाली मंजूरी
नवी दिल्ली : देशात कोविडविरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळणार आहे. जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला भारतात मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मांडवीय यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, भारताने आपली लस बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल-डोस कोविड -19 लसीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी […]
महिलेला बुरखा परिधान न केल्यामुळे तालिबानी दहशतवाद्यांनी कारमधून बाहेर ओढलं आणि गोळ्या घातल्या
तालिबान : बुरखा परिधान न केलेल्या एक महिलेला तालिबानी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृत्तानुसार, नाजनीन नावाची २१ वर्षीय महिला बल्ख जिल्हा केंद्राकडे जात होती, यावेळी तालिबानी दहशतवाद्यांनी तिला अडवून कारमधून बाहेर ओढलं आणि त्यानंतर तिची गोळ्या घालून हत्या केली. तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने या घटनेचे खंडण केले आहे. तालिबानकडून […]
हळद- मधाचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या…
हळद मधासह एकत्रित केली जाते, याला गोल्डन हनी म्हणूनही ओळखले जाते, हजारो वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा समावेश आहे. आपण या शक्तिशाली नैसर्गिक अँटीबायोटिककडे दुर्लक्ष करू शकत नाही. विशेष म्हणजे अलिकडच्या काळात पाश्चात्य औषधांमध्ये त्याचा वापर झपाट्याने वाढला आहे. भारतात या दोन्ही पदार्थांचा अनेक शतकांपासून विविध आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून वापर केला जात आहे. हळद ही […]
काळजी घ्या! राज्यात वाढतोय डेल्टा व्हेरिएंटचा धोका…
नाशिक : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे संक्रमित झालेल्या ३० रुग्णांचा शोध लागल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यभरात अजूनही कोरोना संसर्गाची 5000 प्रकरणे दररोज नोंदवली जात आहेत. नाशिकपूर्वी पुण्यातही डेल्टा प्रकारात दोन संक्रमित रुग्ण आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे 30 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. […]
मोठी दुर्घटना टळली! बस घसरून दरीत लटकली, ड्रायव्हरने सर्व प्रवाशांना खाली उतरेपर्यंत ब्रेक दाबून ठेवला…
हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील सिरमोर येथे शुक्रवारी दुपारी एक मोठी दुर्घटना टळली. येथे शिलाईमधील बोहराद खड्डजवळ नॅशनल हायवे-707 वर एक खासगी बस घसरून दरीत लटकली. यावेळी बसमध्ये 24 प्रवासी होते. प्रसंगावधान दाखवत ड्रायव्हरने ब्रेक लावला आणि सर्व प्रवाशांना खाली उतरेपर्यंत ड्रायव्हरने ब्रेक दाबून ठेवला. यानंतर प्रवासी आणि क्लीनर यांनी मिळून ड्रायव्हरचा जीव वाचवला. मिळालेल्या […]










