मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 7 ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधि सेवा सप्ताह आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाने दिली आहे. राज्यातील सर्व खेड्यांपर्यंत मोफत विविध सेवा व विधि सेवेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तत्वत: मंजुरी
मुंबई : राज्यातील ऑटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्वत: मंजुरी दिली. तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी बोर्ड स्थापन करण्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, असंघटित […]
केंदीय कर्मचाऱ्यांना मिळाले मोठे गिफ्ट, महागाई भत्त्यात पुन्हा वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्यासाठी दिवाळी भेट म्हणून महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. DA मध्ये आणखी 3 टक्क्यांची वाढ म्हणजे आता महागाई भत्ता (DA) […]
ड्रग्ज प्रकरण : अनन्या पांडेच्या घरी NCB चा छापा, शाहरुख खानच्या ‘मन्नत’ मध्येही सर्च ऑपरेशन
मुंबई : ड्रग्ज प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. एनसीबीची टीम गुरुवारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचली आहे. तसेच एनसीबीने अनन्या पांडेला आज दुपारी 2 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. अनन्या पांडे प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. एनसीबी टीम केवळ अनन्याच्या घरीच नाही तर शाहरुख खानचे घर मन्नतमध्येही सर्च ऑपरेशन करत आहे. या […]
कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामे रोखा, तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकल्या जातात असे निदर्शनास आले आहे, याठिकाणी कॅमेरे लावून जे हे करीत असतील त्यांच्यावर […]
‘रामायण’ या मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन
मुंबई : ‘रामायण’ या मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन झाले आहे. ‘रामायण’ मध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलियाने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आहे. ‘रामायण’मध्ये भगवान राम यांचा बालपणीचा मित्र निषाद राजची भूमिका चंद्रकांत यांनी साकारली होती. दीपिका चिखलियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘निषाद राज’ अर्थात चंद्रकांत पंड्या यांचा फोटो शेअर […]
पाईपलाईनद्वारे घरोघरी गॅसच्या व्यवस्थेमुळे उद्योगाला चालना- अमित देशमुख
लातूर : लातूर शहरात लवकरच पाईपलाईनद्वारे गॅस मिळण्याच्या व्यवस्थेमुळे या शहरातील उद्योगालाही चालना मिळणार असून लातूरच्या विकासाला आता यामुळे गती मिळेल. औसा तालुक्यात इंधनावर आधारित नवीन औद्योगिक वसाहत स्थापन्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. महानगरपालिकांतर्गत औसा रोड येथे अशोका गॅस एजन्सीजच्या सीएनजी गॅस पाईपलाईनच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. […]
अजित पवार यांनी ‘तो’ शब्द पाळला, सत्ताधाऱ्यांसह विरोधी आमदारांना मोठे गिफ्ट
मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात यात आणखी वाढ करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे, त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास […]
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना उर्वरित सर्व १०६ तालुक्यांमध्ये राबविण्यास राज्य शासनाची मंजुरी
मुंबई : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके, तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुके अशा एकूण २४४ तालुक्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबविण्यात येत होती. या योजनमध्ये राज्यातील उर्वरित सर्व १०६ तालुक्यांचा समावेश केला असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक […]
महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश
मुंबई : विविध संघटित व असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महिला नोकरी करीत आहेत. या सर्व महिलांची सुरक्षा हा राज्य शासनाच्या दृष्टीने प्रधान्याचा विषय असून गृह विभागाने सर्वसमावेशक मार्गदर्शक नियमावली तात्काळ तयार करून जाहीर करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. राज्यातील माहिती तंत्रज्ञान प्रकल्प असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी गठित समितीने […]










