मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि इतरांवर मुंबईतील विशेष न्यायालयात आरोप दाखल केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 जुलै रोजी होणार आहे. सध्या या प्रकरणात न्यायालयाने आरोप निश्चित केलेले नाहीत. विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी न्यायालयात […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
माजी मिस ब्राझील ग्लेसी कोरीयाचे निधन
ब्राझील : माजी मिस ब्राझील ग्लेसी कोरीया हिचे वयाच्या २७ व्या वर्षी निधन झाले. ती रुटीन टॉन्सिल शस्त्रक्रियेसाठी गेली होती, मात्र ऑपरेशनच्या गुंतागुंतीमुळे तिचे निधन झाले. वृत्तानुसार, तिचे टॉन्सिल काढताना तिला प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि 4 एप्रिल रोजी तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर दोन महिने कोमात राहिल्यानंतर मेंदूतील रक्तस्त्रावामुळे एका खाजगी क्लिनिकमध्ये तिचा मृत्यू झाला. […]
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही – जयंत पाटील
मुंबई : सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.’ असं ते म्हणाले. जयंत पाटील यांनी ट्वीट केलं कि, […]
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान आता खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले कि, तुमचं म्हणणं आहे ना, आघाडीतून बाहेर पडा, नक्की विचार करु, पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं. तुमची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. मोबाईलवरुन, व्हॉट्सअॅपवरुन तुमच्या मागण्या मांडण्यापेक्षा समोर येऊन तुमच्या ज्या […]
पुण्यात खळबळ! अल्पवयीन मुलाने केली आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या
भोसरी : एका 17 वर्षीय मुलाने आपल्या आईच्या प्रियकराची हत्या केली, कारण तो सतत या मुलाला शिवीगाळ करून मारहाण करायचा. दीपक गोपाळ वाघमारे (२९) असे मृताचे नाव आहे. अल्पवयीन मुलाने एक कोयता चोरला आणि आपल्या आईच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक वाघमारे याचे अल्पवयीन मुलाच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. दीपक […]
बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी ५० लाखांची मागणी, मुलीला आणि तिच्या आईला पोलिसांकडून अटक
गुरुग्राम : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी ५० लाखांची मागणी करणाऱ्या मुलीला आणि तिच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीने केस मागे घेणार असल्याचे सांगत यासाठी आरोपीला 50 लाख रुपये द्यावे लागतील, असा आरोप आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या भावाने याप्रकरणी सेक्टर 51 महिला पोलीस ठाण्यात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी कारवाई करत मुलीला […]
आता इलेक्ट्रिक कारला आग! मुंबईत Tata Nexon EV ने घेतला पेट…
मुंबई : इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटनांनंतर आता इलेक्ट्रिक कारला आग लागली आहे. भारतातील सर्वाधिक विकले जाणारे इलेक्ट्रिक वाहन Tata Nexon EV ने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन ईव्ही आगीत जळताना दिसत आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यात […]
देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली ८३ हजारांच्या पुढे, 38 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 13313 नवीन रुग्ण आढळले आहेत. ही संख्या बुधवारच्या तुलनेत ८.7 टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत कोविडमुळे 38 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशातील सक्रिय […]
दोन प्रौढांना लग्नासाठी कुटुंब, कुळ, समुदायाची संमती आवश्यक नाही, उच्च न्यायालयाचा निर्णय
अलीकडेच जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की जेव्हा दोन प्रौढ व्यक्ती सहमतीने एकमेकांना जीवन साथीदार म्हणून निवडतात तेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संमती आवश्यक नसते. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, ज्या प्रकरणांमध्ये दोन प्रौढ व्यक्तींनी विवाह करण्याचा निर्णय घेतला, त्यात केवळ संबंधित व्यक्तींच्या संमतीचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. एकल-न्यायाधीश न्यायमूर्ती एम.ए.चौधरी म्हणाले, “जेव्हा […]
ब्रेकिंग! केतकी चितळेला फेसबुक पोस्ट प्रकरणी ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
ठाणे : मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यानंतर ठाणे पोलिसांनी तिला अटक केली होती. केतकी चितळे हिने पवारांच्या आजारपणावर, दिसण्यावर, आवाजावर अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यामुळे आणि त्यांना भ्रष्ट संबोधल्याच्या कारणावरून तिला अटक करण्यात आली होती. तिला १४ मे […]










