Singer Daler Mehndi gets jail in 2003 human trafficking case
देश मनोरंजन

ब्रेकिंग! प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांना अटक, मानव तस्करी प्रकरणी न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा

पटियाला : प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबच्या पटियाला न्यायालयाने मानवी तस्करी प्रकरणी त्यांची तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. नुकतेच न्यायालयाने मेहंदीला दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. काही वर्षांपूर्वी दलेर मेहंदीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गायक दलेर मेहंदीने 2003 मध्ये मानवी तस्करीच्या गुन्ह्यात दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या […]

high court rejects plea to stay final year mbbs exam
देश

NEET परीक्षा ठरलेल्या दिवशीच होणार, उच्च न्यायालयाने फेटाळली ‘ती’ याचिका…

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी 2022 सालासाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) पदवीपूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. एकल न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला की NEET आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या तारखांमध्ये संघर्ष आहे. कोर्टाने आदेश दिला की याचिकेत अजिबात योग्यता नाही आणि ती फेटाळली […]

OBC creamy layer
देश

आता सरकारला भ्रष्ट, जुमलाजीवी म्हणता येणार नाही, सभागृहात ‘या’ शब्दांच्या वापरावर बंदी, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी…

नवी दिल्ली : आता कोणताही खासदार लोकसभा आणि राज्यसभेत केंद्र सरकारला भ्रष्ट किंवा निरुपयोगी म्हणू शकणार नाही. आता सभागृहाच्या कामकाजादरम्यान अनेक असे शब्द वापरणे चुकीचे आणि असंसदीय मानले जाईल. संसदेच्या दोन्ही सभागृहात शब्दांच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द 2021 या शीर्षकाखाली अशा शब्द आणि वाक्यांची यादी तयार केली […]

Petrol, diesel prices
महाराष्ट्र

ब्रेकिंग! पेट्रोल आणि डिझेलच्या किमती झाल्या कमी, राज्य सरकारची घोषणा

मुंबई : राज्यातील नागरिकांना महागाईच्या जाचातून काहीसा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रतिलिटरने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठक निर्णय गुरूवार दि. १४ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात: – पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति […]

monkeypox
देश

चिंताजनक! परदेशातून परतलेल्या व्यक्तीमध्ये आढळली मंकीपॉक्सची लक्षणे, रुग्णालयात दाखल

केरळ : परदेशातून परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागल्याने केरळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी गुरुवारी सांगितले. त्या म्हणाल्या की त्यांचे नमुने गोळा केले गेले आहेत आणि चाचणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत. चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतरच या आजाराची पुष्टी करता येईल. वीणा जॉर्ज म्हणाल्या कि, “त्या […]

Leaving work and combing your hair is a serious form of abuse
महाराष्ट्र मुंबई

स्त्रीला करिअर आणि मूल यापैकी एकाची निवड करण्यास सांगता येणार नाही – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : एका महिलेला तिचे मूल आणि करिअर यापैकी एकाची निवड करायला लावू नये, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. यासोबतच न्यायालयाने एका महिलेला तिच्या मुलीला सोबत पोलंडला घेऊन जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. महिलांच्या व्यावसायिक विकासाच्या अधिकाराचा विचार करण्यात कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश अयशस्वी ठरल्याच्या कारणावरून महिलांच्या प्रवासावर निर्बंध घालणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश न्यायमूर्ती […]

Coronavirus Vaccination Supreme Court Hearing Center Rejects The Possibility Of Home Covid Vaccination
देश

ब्रेकिंग! 18 वर्षांवरील लोकांना कोरोनाचा बूस्टर डोस मिळणार मोफत, 75 दिवसांची विशेष मोहिम

नवी दिल्ली : देशातील 18 ते 59 वयोगटातील लोकांना सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचा बूस्टर किंवा तिसरा डोस मिळू शकेल. हे 75 दिवसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत केले जाईल, जे 15 जुलैपासून सुरू होऊ शकते. मोदी मंत्रिमंडळाने आज याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविडच्या खबरदारीच्या डोसबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे […]

Emergency declared in Sri Lanka
ग्लोबल

श्रीलंकेत आणीबाणी जाहीर, राष्ट्रपतींच्या पलायनानंतर पंतप्रधानांनी घेतला निर्णय

श्रीलंका : श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या पलायनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली. राष्ट्रपती राजीनामा न देता पळून गेल्याने मोठ्या संख्येने लोक पंतप्रधानांचे निवासस्थान आणि पंतप्रधान कार्यालयाबाहेर निदर्शने करत आहेत. या लोकांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांसाठी खूप कठीण झाले आहे. […]

Water To Be Released From Khadakwasla Dam
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून विसर्ग कमी करून केला 5564 क्युसेक, पावसाच्या प्रमाणानुसार पुढील निर्णय…

पुणे : संततधार पावसामुळे खडकवासला धरण जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान, खडकवासला धरण परिसरात मंगळवारच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग कमी करून सकाळी ११ वाजता ५५६४ क्युसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा […]

PITBULL ATTACKS, OLD WOMAN DIED IN BALRAMPUR HOSPITAL
देश

भयंकर! पाळीव पिटबुलने केलेल्या हल्ल्यात सेवानिवृत्त शिक्षिकेचा मृत्यू, शरीरावर जखमांच्या अनेक गंभीर खुणा

लखनौ : घरातील पाळीव कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कैसरबागच्या बंगाली टोला येथे राहणाऱ्या सुशीला त्रिपाठी या मंगळवारी त्यांच्या पाळीव पिटबुलने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर नातेवाइकांनी त्यांना बलरामपूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मंगळवारी […]