President Draupadi Murmu
देश

द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ, असा असेल शपथविधी सोहळा

नवी दिल्ली : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (25 जुलै) देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा (CJI NV Ramana) त्यांना १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ देतील. त्यानंतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील. शपथ घेतल्यानंतर नव्या राष्ट्रपती देशाला संबोधित करतील. […]

first case of monkeypox; Check symptoms, treatment of rare disease
देश

मंकीपॉक्सने वाढवली चिंता! केंद्राने बोलावली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की आज दुपारी आरोग्य सेवा महासंचालनालय (DGHS) द्वारे मंकीपॉक्सवर उच्च-स्तरीय आढावा बैठक घेतली जाईल. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे 4 रुग्ण आढळले आहेत. रविवारी दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना घाबरू नका असे सांगितले आणि त्यांना आश्वासन दिले की ‘व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्वोत्कृष्ट टीम […]

नाशिक महाराष्ट्र

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने पूल बांधावा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सावरपाडा गावातील वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तहसिलदारांसह इतर अधिकारी यांनी आज पाहणी केली. या पाहणीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी मागवून घेतला होता. त्यानुसार लगेचच पाऊले उचलत नवीन पुलाच्या उभारणी करण्याचे निर्देश […]

Solapur St Bus Accident: More Than 35 Passengers Were Injured
महाराष्ट्र सोलापूर

सोलापूर-गाणगापूर बसचा अपघात, मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत दिले ‘हे’ आदेश

सोलापूर : सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात ३५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास अक्कलकोट – मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी होऊन ही मोठी दुर्घटना घडली. या बसमध्ये जवळपास ७० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री […]

Krunal Pandya and wife Pankhuri Sharma blessed with baby boy
क्रीडा

कृणाल पांड्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन, मुलाचे नाव ठेवले ‘कवीर’

मुंबई : कृणाल पांड्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. कृणाल पांड्या आणि पंखुरी शर्मा यांना मुलगा झाला आहे. कवीर कृणाल पंड्या असे बाळाचे नाव ठेवण्यात आले आहे. कवीर म्हणजे “सूर्य”. कृणाल पांड्याने इंस्टाग्राम पोस्टवरून याबाबत माहिती दिली. अनेक क्रिकेटपटूंनी या जोडप्याचे अभिनंदन केले.   View this post on Instagram   A post shared by Krunal […]

selling an eight month old girl 4 arrested incident in virar
पुणे महाराष्ट्र

पुण्यात ड्रग्सची विक्री करणाऱ्या परदेशी व्यक्तीला अटक, लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

पुणे : पुण्यात ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका परदेशी व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चर्तु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तब्बल 12,38,100 रुपये किंमतीचा 82 ग्रॅम 540 मिलीग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करणा-या नायजेरियन व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक चर्तु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना येथील ब्रोमन चौकाकडुन स्पायसर […]

court order
देश

जन्म प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांमध्ये फक्त आईचे नाव समाविष्ट करणे हा मूलभूत अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

केरळ : एका ऐतिहासिक निर्णयात, केरळ उच्च न्यायालयाने नमूद केले आहे की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जन्म प्रमाणपत्रात आणि इतर कागदपत्रांमध्ये फक्त आईचे नाव समाविष्ट करण्याचा अधिकार आहे. न्यायमूर्ती पीव्ही कुन्हीकृष्णन यांनी असे मानले की हा अधिकार नागरिकांचा आहे, कारण सर्व नागरिकांचे संरक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे, ज्यांची गर्भधारणा विवाहबाह्य किंवा बलात्कारातून झाली असेल, त्यांच्या […]

monkeypox
देश

ब्रेकिंग! दिल्लीतही आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण, प्रवासाचा इतिहास नसतानाही मंकीपॉक्सची लागण

नवी दिल्ली : परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेल्या दिल्लीतील माणसाला मंकीपॉक्स विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता देशात मंकीपॉक्समुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला असून तो मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत पुष्टी केली आहे. हा रुग्ण 31 वर्षांचा असून त्याचा परदेश प्रवासाचा […]

due date for itr filing for the year 2020 21 is extended
अर्थकारण देश

ITR वेळेवर भरा! उशीर झाल्यास प्राप्तिकर कायद्यानुसार भरावे लागेल विलंब शुल्क

आयटीआर फाइलिंग : आयकर विभागाने शनिवारी आयकर भरणाऱ्यांना ऑनलाइन मोहिमेचा भाग म्हणून विलंब शुल्क भरणे टाळण्यासाठी मूल्यांकन वर्ष 2023 साठी 31 जुलैच्या देय तारखेपर्यंत तुमचे आयकर रिटर्न फाइल करण्याची आठवण करून दिली आहे. आयकर विभाग आयटीआर वेळेवर भरणे सुनिश्चित करण्यासाठी आयकरदात्यांना मजकूर संदेश आणि ईमेलद्वारे रिमाइंडर पाठवत आहे. रिमाइंडरमध्ये, आयकर विभागाने विलंब शुल्क टाळण्यासाठी सोशल […]

raj uddhav thakrey
महाराष्ट्र मुंबई राजकारण

उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, शिवसेना फुटण्याचे श्रेय त्यांनाच – राज ठाकरे

मुंबई : ”उद्धव ठाकरे यांना संपूर्ण देश जेवढा ओळखत नाही, तेवढा मी चांगल्या प्रकारे ओळखतो. ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. उद्धव बोलतात एक व करतात दुसरेच. शिवसेनेतील फुटीचे श्रेय भाजपला नव्हे, तर स्वतः सेना नेतृत्वाला जात असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब […]