मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखेर माफी मागितली आहे. माझ्याकडून चूक झाली क्षमा करा असे त्यांनी म्हटले आहे. २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ब्रेकिंग! संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, न्यायालयाचा आदेश
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने संजय राऊतच्या 8 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ईडीने काल संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर छापा टाकला आणि तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेतले. आज संजय राऊत यांच्या वतीने अशोक मुंदरगी आणि ईडीच्या वतीने हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयात युक्तिवाद […]
ज्येष्ठ पत्रकार आणि माजी माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचे निधन
औरंगाबाद : राज्याचे माजी मुख्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचे आज (1 ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. देवगिरी तरुण भारतचे संपादक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेले दिलीप धारूरकर यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. धडाडीचे पत्रकार म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. दैनिक तरुण भारत […]
उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ठाकरे हे राऊत यांच्या भांडुप उपनगरातील निवासस्थानी गाडीतून गेले. राऊत आणि ठाकरे यांचे जवळचे नाते आहे. संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने कथित पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. मुंबईतील चाळीच्या पुनर्विकासात झालेल्या अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात तपास यंत्रणा […]
झोका खेळल्यामुळे मिळतात अनेक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या…
पुणे : श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीचे विशेष महत्त्व आहे. ग्रामीण भागासह शहरातही मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीच्या दिवशी झोके देखील बांधले जातात. अनेक मुली, गृहिणी यादिवशी झोका खेळण्याचा आनंद लुटतात. मात्र, झोका खेळल्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे देखील मिळतात, हे आपल्याला माहित आहे का? खूप कमी लोकांना माहित आहे की झोका […]
कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, मध्यरात्री विनयभंगाचा गुन्हाही दाखल
मुंबई : पत्रा चाळ घोटाळ्यातील साक्षीदार असलेल्या एका महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर राऊत यांच्या अडचणीत भर पडली आहे. ईडीच्या साक्षीदार स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्याविरोधात रविवारी रात्री वाकोला पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. बलात्कार आणि हत्येची धमकी मिळाल्याची तक्रार पाटकर यांनी केली होती. वाकोला पोलीस ठाण्यात रविवारी […]
अभिनेता सलमान खानला दिलासा! जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर शस्त्र परवाना मंजूर
मुंबई : मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानला बंदुकीचा परवाना मंजूर केला आहे. 22 जुलै रोजी सलमानने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली होती. जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर त्याने बंदुक परवान्यासाठी अर्ज केला होता. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याने तशी विनंती केल्यानंतर त्याला शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे, असे […]
घाबरू नका पण काळजी घ्या… मंकीपॉक्सविषयी जाणून घ्या…
पुणे : भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात ‘मंकीपॉक्स’ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रुग्ण २ ते ४ आठवड्यात बरा होतो. तथापि, लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करु शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीने या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी […]
Sanjay Raut Arrested: संजय राऊत यांच्या अटकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले ते जाणून घ्या..
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना जमीन घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना ईडीने अटक केली असली तरी तपासानंतर सत्य बाहेर येईल, असे म्हटले आहे. पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय? पत्राचाळ प्रकरणात बिल्डरने १०३४ कोटींची […]
कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला 30 लाखांचे पारितोषिक जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
औरंगाबाद : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद येथे केली. कॉमनवेल्थ स्पर्धेत देशासह महाराष्ट्राच्या नावावर रौप्य पदकाची मोहोर उमटविणाऱ्या सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या संकेत सरगर या खेळाडूची ही कामगिरी […]










