जयपूर : एका सात वर्षांच्या मुलीचा तिच्याच १६ वर्षीय आत्याने शिरच्छेद केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यातील झिंझवा फाला गावात ही भयंकर घटना घडली. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबियांनी असा दावा केला की ती मागील दोन दिवसांपासून विचित्रपणे वागत होती. ती हातात तलवार घट्ट धरून पूजा करत होती. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
अभिनेत्री दिया मिर्झाची भाची तान्या काकडे हिचे अपघातात निधन, कुटुंबावर शोककळा
हैदराबाद : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे, ज्याची माहिती तिने स्वतः दिली आहे. दिया मिर्झाची भाची तान्या काकडे हिचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, दियाच्या भाचीचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. तान्या सोमवारी सकाळी हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळावरून तिच्या मित्रांसह घरी जात असताना तिच्या कारला अपघात झाला. दीया आपल्या भाचीच्या मृत्यूने खूप दु:खी […]
नर्सिंग कॉलेजच्या 60 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा, एकीचा मृत्यू तर 46 विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक
छत्तीसगड : छत्तीसगडमधील भिलाई येथील रस्तोगी नर्सिंग कॉलेजमध्ये ६० विद्यार्थिनी अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या सर्व विद्यार्थिनींना नेहरू नगर येथील एका खासगी रुग्णालयात तीन दिवसांपासून दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 46 विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक आहे. रस्तोगी नर्सिंग कॉलेज व्यवस्थापनाने ही बाब आतापर्यंत लपवून ठेवली होती. मात्र, एका विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर […]
राज्याच्या विकासासाठी आता डबल इंजिन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : देशात राज्याचा क्रमांक एक राखण्यात आणि राज्याच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मोठे योगदान असून यापुढे प्रगतीपथावर जाण्यासाठी दोन इंजिन आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हीरक महोत्सवानिमित्ताने बांद्रा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महामंडळाचे कार्य […]
केंद्र-राज्याच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवा, एकमेकांमध्ये उत्तम समन्वय ठेवणे आवश्यक
मुंबई : नव्या सरकारकडून प्रधानमंत्र्यांनीदेखील मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. विशेषत: केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचावे, आपली कार्यक्षमता वाढवताना एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. तसेच योजनांमध्ये लोकांचाही सहभाग वाढवावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यातील सर्व योजनांच्या लाभार्थींना वैयक्तिकरित्या मुख्यमंत्र्यांचे […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘औरंगाबादची विकासाकडे घोडदौड’ पुस्तिकेचे प्रकाशन
औरंगाबाद : जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे प्रकाशित ‘औरंगाबादची विकासाकडे घोडदौड’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (३१ जुलै) विभागीय आयुक्त कार्यालयात झाले. या माहिती पुस्तिकेमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शासनाच्या योजना आणि प्रकल्पाची फलनिष्पत्ती याविषयीच्या माहितीचा समावेश आहे. प्रकाशनाप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड,खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री […]
दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक या तात्पुरत्या स्वरुपाच्या (6 महिने) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी 12 ऑगस्ट, 2022 पर्यंत लेखी अर्ज आयुक्त दिव्यांग कल्याण, चर्चरोड, पुणे-1, येथे टपालाने अथवा commissioner.disability@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठवावे. या पदासाठी शैक्षणिक अर्हता- संगणक शास्त्र/माहिती व तंत्रज्ञान यामधील पदविका/प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. किंवा संगणक शिक्षकामधील पदवी, […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गाकरिता राबविण्यात येणाऱ्या विद्यमान ‘भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरती प्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरती प्रक्रियेचे नियोजन या व इतर अनुषंगिक बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा […]
मुंबई उपनगर जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांचेद्वारा सन २०२१-२२ या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्हयातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडु) आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे / योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना […]
आयटीआय प्रवेशासाठी 27 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशाकरिता 27 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, मुंबई विभागातील इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे यांनी केले आहे. मुंबई विभागाच्या वतीने मुलुंड आयटीआय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई विभाग सहसंचालक यांच्या वतीने दुर्गे यांनी […]









