नवी दिल्ली : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत 36.50 रुपयांनी कमी झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. यानंतर दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपयांनी कमी झाली आहे. घरगुती वापरासाठी आणि व्यावसायिक वापरासाठी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत तेल कंपन्या ठरवतात. कच्च्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद : राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करणार येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. तसेच शहरातील टी.व्ही. सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे कालपासून औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सिल्लोड येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून मुख्यमंत्री सायंकाळी […]
CWG 2022 : मीराबाई चानूने इतिहास रचला, कॉमनवेल्थ २०२२ स्पर्धेतील पहिलं विक्रमी सुवर्णपदक!, संकेत सरगरने रौप्य पदक तर तासांत पुजारीने कांस्यपदक जिंकलं, देशभरात जल्लोष
बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ २०२२ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कोट्यवधी देशवासियांच्या अपेक्षा वेटलिफ्टर मीराबाई चानूने पूर्ण केल्या आहेत. स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ४९ ग्रॅम वजनी गटात विक्रम रचून देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले तर क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. म्हणजेच मीराबाईने एकूण 201 किलो […]
महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरणाबाबत सकारात्मकता निर्माण करावी – प्रधान सचिव मनीषा वर्मा
अमरावती : रोजगाराविषयी प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करुन रोजगार प्राप्त होईपर्यंत सहभागी महिला प्रशिक्षणार्थींचे सातत्याने समुपदेश करावे. प्रेरणादायी सत्र, उद्योजक कंपन्यांचे भरती मेळावे व विषय तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे नियमीत आयोजन करावे. प्रशिक्षणानंतर रोजगार प्राप्त होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबाबत सकारात्मकता या महिलांमध्ये निर्माण करावी, अशा सूचना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा […]
मोठी बातमी! ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या आवडीच्या श्रेणीत क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा अधिकार, केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
केरळ : केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी असे निरीक्षण नोंदवले की, ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी क्रीडा स्पर्धांमध्ये स्वतंत्र श्रेणी नसताना, त्यांना त्यांच्या आवडीच्या श्रेणीत भाग घेण्याची परवानगी दिली पाहिजे. न्यायमूर्ती व्हीजी अरुण एका ट्रान्सवुमनने केलेल्या याचिकेवर विचार करत होते, जिला जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत भाग घ्यायचा होता परंतु आयोजकांनी सांगितले की ट्रान्सजेंडर व्यक्तींना या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी नाही. […]
थकित शास्तीवर 31 जुलैपूर्वी दंड भरल्यास 90 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार
मुंबई : राज्यभरात १ एप्रिलपासून सुरु असलेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा पहिला टप्पा ३१ जुलै २०२२ रोजी संपत आहे. थकित मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकित शास्ती भरण्यासाठी संबंधितांना नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांमार्फत नोटीस देण्यात आल्या आहेत. संबंधितांनी मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील थकित शास्तीवर ३१ जुलै २०२२ पूर्वी दंड भरल्यास […]
क्षयरोग दुरीकरणासाठी लोकसहभाग घ्यावा – आरोग्यसेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन
पुणे : नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, पाठपुरावा याद्वारे कार्यक्रमाचे विकेंद्रीकरण करून गावपातळी पर्यंतच्या लोकांचा क्षयरोग दुरीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले. पुणे येथे उभारण्यात आलेल्या टी.बी. वॉर रूमचे उद्घाटन आरोग्य सेवा आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ. […]
सरपंच पदाची थेट निवडणूक; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी
मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 30 नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमद्वारे आता गावातील पात्र मतदारांकडून पंचायतीच्या सरपंच पदाची थेट निवडणूक करण्याची पद्धती अवलंबिण्यात येणार आहे, असा अध्यादेश ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. प्रत्येक सार्वत्रिक […]
अंधेरीत चित्रपटाच्या सेटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई : अंधेरी पश्चिम भागात संध्याकाळी 4.30 वाजता लेव्हल टू आग लागली. याबाबत मुंबई अग्निशमन दलाने माहिती दिली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अंधेरी पश्चिम येथील चित्रकूट चित्रकूट मैदान आणि बँक्वेटमध्ये आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. उपनगरीय अंधेरी (पश्चिम) येथे शुक्रवारी दुपारी एका चित्रपटाच्या सेटला आग लागली, असे एका नागरी अधिकाऱ्याने […]
मिग-21 लढाऊ विमान अपघात : विंग कमांडर एम राणा आणि फ्लाइट लेफ्टनंट अद्वितीय बल शहीद
राजस्थान : गुरुवारी रात्री भारत-पाकिस्तान सीमेवरील बारमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान कोसळले. अपघातानंतर विमानाचे अवशेष सुमारे एक किलोमीटर परिसरात पसरले आणि त्याला आग लागली. विमानात उपस्थित असलेले दोन्ही वैमानिक या अपघातात शहीद झाले. मिग अपघाताच्या घटनेने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आले […]










