बेंगळुरू : गायीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून कर्नाटक पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. बेंगळुरूमध्ये ही घटना घडली असून याबाबत पोलिसांनी सोमवारी माहिती दिली. मंजुनाथ असे या आरोपीचे नाव असून तो ३४ वर्षांचा आहे. मंजुनाथ हा मंड्या जिल्ह्यातील मद्दूर शहराजवळील गेज्जलगेरे गावचा रहिवासी आहे. त्याला हे कृत्य करताना पकडणाऱ्या त्याच्या मित्राच्या जबाबावरून पोलिसांनी त्याला […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पीव्ही सिंधूने मिळवले सुवर्णपदक, राष्ट्रकुल स्पर्धेत दमदार कामगिरी
बर्मिंगहम : भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. यापूर्वी सिंधूने २०१४ साली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते, तर २०१८ साली रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यामुळे तिचे हे राष्ट्रकुलमधील पहिले सुवर्णपदक होते. या सामन्यात पहिला गेम सिंधूने २१-१५ असा जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने दमदार कामगिरी केली आणि जेतेपद पटकावले. सिंधूने […]
मोठी बातमी! संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांना सुनावण्यात आलेली ईडीची कोठडी आज संपली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी ईडीकडून संजय राऊत यांची पत्राचाळ प्रकरणात चौकशीसाठी आणखी ईडीच्या कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे न्यायालयाने राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ३१ जुलै […]
Video : दोन हेलिकॉप्टर धडकल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, चॉपरचे पंखे एकमेकांना भिडले आणि…
Helicopter Accident Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन हेलिकॉप्टर एकमेकांना धडकताना दिसत आहेत. दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्यानंतर त्यांचे मोठे नुकसान झाले, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यात एका हेलिकॉप्टरने लॅन्ड करताना तेथेच थांबलेल्या दुसऱ्या हेलिकॉप्टरला धक्का दिला आणि दोन्ही हेलिकॉप्टरचा चुराडा झाला. सोशल मीडियावर अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडिओ व्हायरल […]
शोएब अख्तर मेलबर्नमधील रुग्णालयात घेतोय उपचार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…
ऑस्ट्रेलिया : शोएब अख्तर सध्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. शोएब अख्तरने त्याच्या हॉस्पिटलच्या बेडवरून त्याच्या फॅन्ससाठी एक व्हिडिओ पोस्ट केला. शोएबने त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे, कारण तो सध्या अत्यंत वेदनादायक स्थितीत आहे. सध्या शोएब अख्तरच्या दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. हे त्याचे अंतिम ऑपरेशन असेल, असा विश्वास त्याने व्हिडिओमध्ये […]
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, ‘सामना’मध्ये छापलेल्या ‘त्या’ कॉलमबाबत ईडी करणार चौकशी
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कोठडीची मुदत आज संपत आहे. अंमलबजावणी संचालनालय आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करणार आहे. दुसरीकडे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राऊत यांचा कॉलम रविवारी सामनामध्ये छापून आला. त्यानंतर राऊत यांनी तुरुंगातूनच ते लिहिलंय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणानंतर आता ‘सामना’ या मुखपत्रात लिहिलेल्या […]
राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्यामजी येथील जत्रेत चेंगराचेंगरी, 3 महिला भाविकांचा मृत्यू
राजस्थान : राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्यामजी येथील जत्रेत सोमवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३ महिला भाविकांचा मृत्यू झाला. पहाटे ५ वाजता मंदिराचे प्रवेशद्वार उघडताच गर्दी अनियंत्रित झाली आणि लोकांनी धक्काबुक्की सुरू केली. या घटनेत तीन महिला भक्तांचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सध्या […]
पुण्यात अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पुणे : पुणे शहरात गुलटेकडी परिसरातील १५ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडीत मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आरोपी महेश ईश्वर मोरे (२५, रा. गुलटेकडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय शाळकरी मुलगी, तिच्या आई-वडील आणि लहान बहिणीसोबत राहत होती. पीडित मुलीचे […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारावर कारवाई
पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्ल्यूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसांचा दिल्ली दौरा
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या शासकीय भेटीवर असून ते आज दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच, उद्या रविवार रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या ७ […]










