मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे यांची महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ते नागपूरचे भाजपचे नेते आहेत. बावनकुळे हे नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात. विधान परिषदेत भाजपचा एक आमदार आहे. त्याचबरोबर आमदार आशिष शेलार यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बावनकुळे हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. आशिष शेलार हे वांद्रे पश्चिमचे […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पुणे : स्वारगेट स्टँन्ड येथून 6 वर्षीय मुलीचे अपहरण, 12 तासांत आरोपी पोलीसांच्या ताब्यात
पुणे : पुण्यात एका 6 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत स्वारगेट पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या चिमुकलीला घेऊन पसार झालेल्या आरोपींना पोलीसांनी 12 तासामध्ये जेरबंद केले आहे. स्वारगेट स्टँन्ड येथुन कोणीतरी अज्ञात इसमाने 6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपह्यत […]
भयंकर! सासूने केला सुनेचा शिरच्छेद, सुनेचे शीर घेऊन पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये आणि…
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अन्नम्मय्या जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रायचोटी शहरातील रामापुरम भागात सुब्बम्मा नावाच्या महिलेने तिच्या बहिणीची सून वसुंधरा (35) हिचा शिरच्छेद केला आणि तिचे डोके हातात घेऊन आणि चाकू घेऊन स्वत: पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, रामापुरम परिसरात राहणाऱ्या वसुंधरा यांचा नवरा राजा […]
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, मेंदूलाही हानी पोहोचल्याची डॉक्टरांची माहिती
नवी दिल्ली : राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या दोन दिवसांनंतरही ते बेशुद्ध आहेत आणि अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्या मेंदूचे प्रचंड नुकसान झाले आहे. एम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूला मोठा फटका बसला. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जशी […]
खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम
पुणे : खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. गुरुवारी मध्यरात्री मंकी हिल ते ठाकूरवाडी यादरम्यान दरड रेल्वे ट्रॅकवर कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील अप दिशेच्या ट्रॅकवर ही दरड कोसळली […]
मिठी नदीत दोन तरुण बुडाले, एका तरुणाचा मृतदेह सापडला
मुंबई : गुरुवारी रात्री माहीम परिसरात मिठी नदीत दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध अद्याप सुरु आहे. या तरुणांची ओळख पटली असून त्यांची नावे जावेद आणि आसिफ अशी आहेत.अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जावेद आणि आसिफ गुरुवारी माहीमच्या दर्ग्यात दर्शनासाठी आले होते. तेथून परतताना दोघेही […]
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून
मुंबई : विधिमंडळाचे सन २०२२ चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक १७ ऑगस्ट पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईत विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका […]
बूस्टर लसीकरणाची गती वाढविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई: राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा तसेच बूस्टर डोस देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज “कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव” अंतर्गत लसीकरणाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. विधिमंडळातील समिती कक्षात सुभाष पाटील आणि अशका पवार यांना […]
यमुना नदीत बोट बुडून मोठी दुर्घटना, 20 जण बुडाल्याची भीती
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात आज यमुना नदीत मोठी दुर्घटना घडली. ३० हून अधिक लोक बोटीतून प्रवास करत होते, ती बोट नदीत बुडाली. सध्या या दुर्घटनेत 20 जण बुडाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाला मदत आणि बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. ही बोट फतेहपूरला जात होती, लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य […]
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतरही व्हेंटिलेटरवर
नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, तरीही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू यांच्या हृदयात ९५ टक्के ब्लॉकेज असल्याचं सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू यांच्या हृदयाच्या मुख्य धमनीत ब्लॉकेज आहे. […]









