मुंबई : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधत या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
विक्रीकर न्यायाधिकरणाच्या खंडपीठांना मुदतवाढ, मुंबईतील खंडपीठ पुण्यात स्थलांतरीत करण्यासही मान्यता
मुंबई : विक्रीकर न्यायाधिकरणाच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मुंबई, पुणे, नागपूर खंडपीठांना ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच मुंबईतील खंडपीठ पुणे येथे स्थलांतरीत करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या तीन खंडपीठांकरिता निर्माण करण्यात आलेल्या एकूण ४१ नियमित व बाह्ययंत्रणेच्या १२ सेवा अशा […]
उर्ध्व गोदावरी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता, देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन पाळल्यामुळे छगन भुजबळ यांनी मानले आभार
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या १ हजार ४९८ कोटी ६१ लाख रुपये खर्चास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा प्रकल्प आदिवासी क्षेत्रात असून गोदावरील नदीच्या उपनद्यांवर आहे. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील ७४ हजार २१० हेक्टर सिंचन क्षेत्रास याचा लाभ होईल. […]
सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करणार
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्याचा मान्यता निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी १६ नियमित व ४ पदे बाह्य यंत्रणेद्धारे अशा २० पदांना देखील मान्यता देण्यात आली. यासाठी एकूण ९७ लाख ८६ हजार खर्च येणार आहे. बहुसंख्य पक्षकारांना ५ लाखांवरील दिवाणी […]
प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करणार
मुंबई : केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण या नव्या योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यास आज आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. एकंदर १२ हजार सहकारी संस्थांना याचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी राज्याच्या हिश्याची १५६ कोटी ५५ लाख रक्कम २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात उपलब्ध […]
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२२ पूर्वी पार पडणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील २५ जिल्हा […]
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करणार, सर्वसमावेशक धोरण निश्चित
मुंबई : राज्यामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यानुसार बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येतील. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा […]
खारघर येथे स्कूल बसने अचानक घेतला पेट, बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला…
पनवेल : खारघर सेक्टर १५ मधील गुडविल इमारतीसमोर एका स्कूल बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक आणि मदतनीसांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. ही बस पीपल्स एज्युकेशन सोसायटीची होती. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर पनवेल […]
ब्रेकिंग! ज्ञानवापी प्रकरणात मोठा निर्णय, वाराणसी जिल्हा न्यायालयाने फेटाळली मशीद समितीची याचिका
उत्तर प्रदेश : वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदू बाजूने दाखल केलेल्या दाव्याच्या योग्यतेला आव्हान देणारी याचिका फेटाळल्याने सोमवारी ज्ञानवापी प्रकरणाला नवे वळण मिळाले. ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पूजेसाठी परवानगी मागणाऱ्या ५ हिंदू महिलांना जिल्हा न्यायाधीश ए.के.विश्वेश यांच्या निकालाने मोठा दिलासा मिळाला आहे. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने एक अर्ज दाखल केला होता की […]
89 वर्षीय पतीकडून वारंवार सेक्सची मागणी, अखेर 87 वर्षीय महिलेने मागितली हेल्पलाइन क्रमांकावर मदत
गुजरात : गुजरातच्या 181 अभयम हेल्पलाइनमध्ये एक असे प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून सगळेच थक्क झाले. या हेल्पलाइन क्रमांकावर महिलांच्या समस्यांचे निराकरण होते. यावर एका 87 वर्षीय वृद्ध आणि आजारी महिलेने फोन केला आणि वारंवार शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या आपल्या 89 वर्षांच्या पतीपासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली. वृद्ध पती पत्नीकडे संबंध ठेवण्यासाठी वारंवार मागणी करतो, […]







