A school bus carrying students to school caught fire at Kharghar
महाराष्ट्र मुंबई

खारघर येथे स्कूल बसने अचानक घेतला पेट, बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला…

पनवेल : खारघर सेक्टर १५ मधील गुडविल इमारतीसमोर एका स्कूल बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक आणि मदतनीसांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. ही बस पीपल्स एज्युकेशन सोसायटीची होती. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर पनवेल अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील खारघर येथील पीपल्स एज्युकेशन संस्थेची स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जातं होती. ही स्कूल बस खारघर सेक्टर १५ येथील घरकुल सोसायटीजवळ आली असता अचानक या बसमधून धुर निघू लागला. त्यानंतर बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं. त्यामुळे सर्व विद्यार्थी या दुर्घटनेतून सुखरूप बचावले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत