Pune Crime News – Five-year-old child raped and murdered in Maval taluka
पुणे महाराष्ट्र

पुणे हादरले! पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संतापाची लाट

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना शनिवारी (१३ डिसेंबर) सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित चिमुकली घरातून अचानक बेपत्ता […]

Student Stabbed in Private Coaching Class in Rajgurunagar, Pune; Police Launch Probe
पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! शिक्षकांसमोरच विद्यार्थाने चिरला दुसऱ्या विद्यार्थ्याचा गळा, खासगी कोचिंग क्लासमध्ये घडली भयंकर घटना

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे एका खासगी कोचिंग क्लासमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमके काय घडले? प्राथमिक माहितीनुसार, […]

नागपूर महाराष्ट्र

श्री संत जनाबाई जन्मस्थळ विकास आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्यात – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई जन्मस्थळ विकास आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्यात असून शासनाने हा आराखडा मान्य करून शिखर समितीकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. सदस्य रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत घेत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, २०२३ मध्ये प्रथम […]

नागपूर महाराष्ट्र

जळगाव महापालिकेच्या गाळेधारकांचे भाडेपट्टा नुतनीकरण नियमानुसार – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : जळगाव महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २ हजार ३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नुतनीकरण नियमानुसार करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. सदस्य सुरेश भोळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, या गाळेधारकांच्या भाडेपट्टयांच्या नुतनीकरणाबाबत भाडे व सुरक्षा ठेव निर्धारण समिती स्थापन करण्यात आली […]

नागपूर महाराष्ट्र

वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांना कायमस्वरूपी घरे देण्याबाबत शासन कटिबद्ध – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

नागपूर : वांद्रे शासकीय वसाहतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी घरे देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आधीच घेतला असून, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. विधानसभा सदस्य वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रश्न विचारला असता त्यावर मंत्री भोसले यांनी माहिती दिली. मंत्री भोसले म्हणाले की, […]

नागपूर महाराष्ट्र

म्हाडा प्राधिकरणाच्या रिक्त पदे आणि पदोन्नती प्रक्रियेला गती देणार – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर : म्हाडा प्राधिकरणाकडून कार्यकारी अभियंता पदोन्नतीच्या खात्यांतर्गत सेवाज्येष्ठता समितीसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर राज्य शासन सहा आठवड्यांच्या आत पदोन्नतीबाबत निर्णय घेईल. न्यायालयाने दिलेल्या कालमर्यादेपेक्षा आधीच, म्हणजे एका महिन्यात डीपीसी पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विधानसभा सदस्य अमीन पटेल आणि योगेश […]

Fast-Track Justice in Crimes Against Minor Girls, Says Deputy CM Eknath Shinde
नागपूर महाराष्ट्र

लहान मुलींवरील अत्याचार प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक न्याय; आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

नागपूर : राज्यात लहान मुलींवरील बलात्कार व खुनासारख्या अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दोषींना तत्काळ आणि कठोर शिक्षा मिळावी, यासाठी शासन ठोस पावले उचलत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराची घटना विधानसभा सदस्य सुहास कांदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली, त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी […]

नागपूर महाराष्ट्र

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत घोषणा, १७ हजार घरांची लॉटरी लवकरच

नागपूर : नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठी सिडकोने जे दर निश्चित केले होते त्यामध्ये थेट १० टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली. या निर्णयामुळे आता ही घरे पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार असून नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे. यासंदर्भात […]

नागपूर महाराष्ट्र

मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग स्टॉक; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा

नागपूर : जुन्या लोकांना तातडीने घरे देणे तसेच नवीन प्रकल्पांकरिता मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग स्टॉक निर्माण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केली. महाराष्ट्रात तसेच मुंबईमध्ये वन, कांदळवन, सीआरझेड, इत्यादी ठिकाणी मूळ स्थितीत पुनर्विकास होऊ शकत नाही. तसेच बऱ्याचशा पायाभूत प्रकल्प जसे की रस्ता रुंदीकरण, मेट्रो, पाणी व मलनिस्सारण प्रकल्प इत्यादींना जलदगतीने पुढे […]

नागपूर महाराष्ट्र

मुंबईत फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

नागपूर : मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या नवीन योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केली. या योजनेमुळे मुंबईतील हजारो पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत. मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेल्या इमारतींचा फनेल झोन व इतर तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास शक्य होत नव्हता. परिणामी उपलब्ध असलेला संपूर्ण चटई […]