पुणे महाराष्ट्र

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण : दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल, तिसऱ्या संशयिताचा शोध अजूनही सुरू

पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासात पोलिसांनी चंद्रकुमार रविप्रसाद कनौजिया (20) आणि शोएब उर्फ ​​अख्तर बाबू शेख (20) या अटक केलेल्या  दोन संशयितांविरुद्ध 60 दिवसांच्या आत आरोपपत्र सादर केले. हे आरोपपत्र सहाय्यक सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी न्यायालयात सादर केले होते. त्यांनी पुष्टी केली की त्यात 500 हून अधिक पानांचे पुरावे […]

Widening Katraj-Kondhwa Road To 84 Metres
पुणे महाराष्ट्र

पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता ८४ मीटर रुंद करण्याचा पुणे महानगरपालिकेचा पुनर्विचार

पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता पुण्यातील एक अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे, जो राजीव गांधी प्राणिसंग्रहालय परिसराला झपाट्याने विकसित होणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक झोनशी जोडतो. या रस्त्यावर दिवसभर गंभीर वाहतूक कोंडी दिसते, ज्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने, पुणे महानगरपालिकेने (PMC) ने 2018 मध्ये रस्ता रुंदीकरण प्रकल्प सुरू केला, ज्याचा उद्देश रस्ता 28 मीटरवरून […]

पुणे महाराष्ट्र

पुण्यात धक्कादायक प्रकार! हरभरे खाल्ले नाहीत म्हणून पत्नीकडून पतीला बेदम मारहाण, घाबरलेल्या पतीची पोलिसात धाव

पुणे : पुणे शहरातील सोमवार पेठ भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरुन पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. या महिलेने लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने पतीला बेदम मारहाण केली, तसेच करंगळीचा चावा घेऊन नख देखील तोडले. या प्रकरणी सोमवार पेठ येथील त्रिशुंड गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीकडून […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर गिरीश महाजनांची माहिती, समन्वयाचा अभाव पण महायुतीत मतभेद नाही…

मुंबई : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी गेले असताना त्यांची तब्येत बिघडली आणि तिथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर ते ठाण्यात आपल्या निवासस्थानी पोहोचले. पण, अद्यापही शिंदेंना विश्रांतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी सत्तास्थापनेत […]

महाराष्ट्र मुंबई

महायुतीची बैठक रद्द, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावाकडे रवाना

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीहून मुंबईत परतले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभराने ते सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी जात आहेत. सरकार स्थापनेबाबत महायुतीची पुढील बैठक शुक्रवारी मुंबईत होणार असल्याचे शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले होते. परंतु, मुंबईत आज होणाऱ्या महायुतीच्या दोन्ही बैठका रद्द करण्यात […]

Shivshahi Bus Accident In Gondia Death Toll Might Increase
महाराष्ट्र

गोंदियात शिवशाही बस उलटली, भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गोंदिया : गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ आज दुपारी 1 च्या सुमारास नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचाव कार्य सुरु करण्यात […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे करायला हवे होते, शिवसेनेच्या उबाठा गटाची काँग्रेसवर टीका

मुंबई : महाराष्ट्राच्या निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकासआघाडीमध्ये खटके उडताना दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असताना आता शिवसेनेच्या उबाठा गटाने पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, त्यांच्या ‘अतिआत्मविश्वासामुळे’ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कामगिरीला धक्का बसला आहे. मुंबईत […]

क्राईम देश

संतापजनक! धावत्या रुग्णवाहिकेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गुन्ह्यात पीडितेची बहीण आणि मेहुण्याचा सहभाग

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 16 वर्षीय मुलीवर धावत्या रुग्णवाहिकेत बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ‘108’ आपत्कालीन सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेत घडली, यातील चार आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत वाहन चालकाचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबर रोजी […]

पुणे महाराष्ट्र

पुणे : बैलाच्या दोरीत अडकून चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू, बैल पळत सुटला आणि…

पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुलगाव या गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंगणात खेळत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाने बैलाला बांधलेली दोरी हातात घेतली आणि बैल पळत सुटला. ती दोरी मुलाभोवती गुंडाळली गेली आणि दोरीबरोबर मुलगा देखील फरपटत गेला. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. शौर्य शैलेश वागस्कर (वय […]

Ajaz Khan
महाराष्ट्र मुंबई

अभिनेता एजाज खानची पत्नी फेलॉनला अटक, पोलिसांना घरात सापडले लाखोंचे ड्रग्स

मुंबई : अभिनेता एजाज खाननं नुकतीच विधानसभा निवढणूक लढवली होती. परंतु आता एजाज खानच्या पत्नीला पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता एजाज खान यापूर्वी अनेकदा ड्रग्ज केसमुळं वादात अडकलेला आहे. एजाज खानची पत्नी फेलॉन गुलीवाला हिला पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महिन्यापूर्वी एजाजच्या अंधेरीतल्या ऑफिसमध्ये एका कर्मचाऱ्याच्या […]