भोपाळ : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक राज्यांमध्ये स्थिती गंभीर होत चालली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देशव्यापी लॉकडाउनची मागणी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात ऑक्सिजन, औषधं आणि इतर साहित्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हटले कि, आता देशव्यापी लॉकडाउन हा एकच पर्याय उरला आहे. एका वर्षापेक्षा जास्त काळ – आपले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी देशासाठी अत्यधिक काम करत आहेत. त्यातील बऱ्याच लोकांना आपण गमावले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात ऑक्सिजन, औषधं आणि इतर साहित्यांचा मोठा तुटवडा आहे. देशाला लवकरच डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत योग्य योजना आखून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय लॉकडाउनची मदत होऊ शकते.
गेल्या वर्षी गरीब लोकांना तसेच स्थलांतरित कामगार आणि सामान्य लोकांना जो त्रास झाला तो टाळण्यासाठी एक सुनियोजित लॉकडाउनची गरज आहे, जो व्हायरसची साखळी तोडण्यास मदत करेल असे गहलोत म्हटले…
I fully endorse the call given by @RahulGandhi ji that national lockdown is the only option left. For more than one year – our doctors , medical staff have been performing under excessive workload for the nation. We have lost many of them.
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) May 6, 2021
मुख्यमंत्री गहलोत यांनी ट्वीटमधून राजस्थानमध्ये संपूर्ण लॉकडाउनचे संकेत दिल्याचं जाणकारांचं मत आहे. राजस्थानमध्ये एक-दोन दिवसांत लॉकडाउन घोषित होण्याची शक्यता आहे.




