पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेला राजकीय हिंसाचार थांबत नाहीये. गुरुवारी केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांच्या गाडीवर स्थानिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या ताफ्यावर दगड व काठीने हल्ला करण्यात आला. ही घटना पश्चिम मिदनापुरच्या पंचखुडीची आहे.
केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी स्वत: सोशल मीडियावर हल्ल्याची माहिती दिली. व्हिडिओ प्रसिद्ध करताना ते म्हणाले कि, “तृणमूलच्या गुंडांनी माझ्या ताफ्यावर हल्ला केला. कारच्या खिडक्या फोडून टाकल्या. खासगी कर्मचार्यांवर हल्ला झाला.”
केंद्रीय केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती मोठं लाकूड घेऊन त्यांच्या दिशेने जाताना दिसत आहे. कारवर काठीने हल्ला करण्यात आल्याचं दिसून येत आहे. मंत्र्यांच्या ताफ्याकडे लोकांची गर्दी येताना दिसते. यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांच्या कार ड्रायव्हरने गाडी परत सुरू केली. त्यांच्या गाडीमध्ये एक मोठं लाकूड फेकल्याचं दिसत आहे, त्याच्यामुळे खिडकीची काच देखील फुटली. जिथे हल्ला झाला तेथे टीएमसी झेंडे व बॅनर लावले आहेत.
TMC goons attacked my convoy in West Midnapore, broken windows, attacked personal staff. Cutting short my trip. #BengalBurning @BJP4Bengal @BJP4India @narendramodi @JPNadda @AmitShah @DilipGhoshBJP @RahulSinhaBJP pic.twitter.com/b0HKhhx0L1
— V Muraleedharan (@VMBJP) May 6, 2021




