नवी दिल्ली : एका संशोधनात भारताच्या दृष्टीने एक दिलासादायक बाब समोर आली आहे. एकदा कोरोना होऊन बऱ्या झालेल्या लोकांना कोरोना लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून समोर आली आहे. पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोनाच्या कठीण काळात ही बाब काहीशी चिंता कमी करणारीच म्हणावी लागेल.
या पार्श्वभूमीवर आपल्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात कोरोना लसीकरणासाठी या माहितीचा उपयोग केला जाईल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत विविध राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. रुग्णालयातील उपलब्ध बेड, ऑक्सिजनची स्थिती, लसीकरणाची प्रगती आणि औषधींचा साठा या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. त्यात आता कोरोना लसीकरणासंदर्भात काही नवे नियम लागू केले जाणार का, हे पाहावे लागेल.
ICYMI – New Penn Institute of #Immunology research in @SciImmunology suggests #postCOVID patients had a robust antibody response after 1st #mRNA vaccine dose but little immune benefit after 2nd: https://t.co/F3PghcSZj0 ? #covid19 @jonepstein1 @parkerici @PENNCoV @PennMedNews
— Penn Medicine MD (@PennMDForum) April 26, 2021




