नवी दिल्ली : McAfee Mobile Research ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, एक नवीन मेलवेयर ८ अँड्रॉयड अॅप मध्ये लपवण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे या अॅप्सचे ७,००,००० हून अधिक डाउनलोड आहेत.
हॅकर्स अँड्रॉयड युजर्संना कोणतेही अॅप्स डाउनलोड करायला भाग पाडतात. हे अॅप्स फोटो एडिटर, वॉलपेपर पजल्स, कीबोर्ड स्किन्स आणि अन्य कॅमेरा संबंधित अॅपच्या रुपाने स्वतःची ओळख असल्याची सांगतात. अॅप्समध्ये एम्बेडेड मेलवेयर मेसेज नोटिफिकेशन्सला हायजॅक करतात. नंतर या अॅप्समधून मेलवेयरच्या माध्यमातून युजर्संची आवश्यक माहिती चोरून आर्थिक फसवणूक करीत असतात. अनऑथराइज्ड खरेदी करतात.
अँड्रॉयड डिव्हाइस मध्ये हे ८ अॅप्स असतील तर तात्काळ डिलीट करा
- com.studio.keypaper2021
- com.pip.editor.camera
- org.my.favorites.up.keypaper
- com.super.color.hairdryer
- com.ce1ab3.app.photo.editor
- com.hit.camera.pip
- com.daynight.keyboard.wallpaper
- Com.super.star.ringtones




