critical covid patients saved after oxygen
कोरोना देश

ऑक्सिजनअभावी ५०० रुग्णांचे प्राण धोक्यात असतानाच घडले असे काही…

दिल्ली : रेमडेसिवीरसोबतच ऑक्सिजनचा होणारा तुटवडा अनेक राज्यांसाठी चितेंची बाब ठरली आहे. राजधानी दिल्लीत ५०० कोरोना रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयात ऑक्सिजन संपल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. वेळ हातातून निघून चालली असतानाच ऑक्सिजनचा टँकर पोहोचला आणि सर्वांना दिलासा मिळाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात ऑक्सिजन संपत आला असल्याचं सांगितल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन टँकर रुग्णालयात पोहोचला. रुग्णालयात गंभीर प्रकृती असणाऱ्या ५०० कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात रात्री २ वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आम्ही सर्वांनीच आशा सोडली होती. वेळ निघून चालली होती. रुग्णालयात दाखल ५०० रुग्णांना या परिस्थितीची माहिती द्यावी असंही आम्हाला वाटत नव्हतं. काहीतरी चमत्कार व्हावा यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करत होतो. ऑक्सिजन टँकर आल्याचं पाहून आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

सत्येंद्र जैन यांनी ट्विट करत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांनी ट्विटमध्ये काही स्क्रीनशॉटही जोडले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत