Remedesivir injection - Dr. Sujay Vikhe

डॉ. सुजय विखे यांचं कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी आणखी एक मोठं पाऊल

अहमदनगर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडत आहे. ऑक्सिजन अभावी होणाऱ्या मृत्यूच्या घटनादेखील मन सुन्न करणाऱ्या आहेत. अशातच आता ऑक्सिजनची निर्माण होणारी समस्या काही अंशी कमी करण्यासाठी विखे पाटील परिवाराने पाऊल उचलले आहे. सुमारे दिड कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे नगरमध्ये कोरोना विरोधात […]

अधिक वाचा
nagpur 85 year old rss swayamsevak sacrifise his oxygen bed for 40 year old man

‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ : 85 वर्षीय आजोबांनी ‘मी माझं जीवन जगलो आहे..’ असे म्हणत आपला बेड तरुणाला दिला आणि…

नागपूर : ‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ अगदी याच उक्तीप्रमाणे एका 85 वर्षीय आजोबांनी एका तरुण व्यक्तीसाठी स्वत:चा ऑक्सिजन बेड सोडला. नारायण भाऊराव दाभाडकर असं या आजोबांचं नाव आहे. परंतु ऑक्सिजन बेड सोडल्यानंतर पुढील तीन दिवसात त्यांचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असणारे नारायण भाऊराव दाभाडकर रुग्णालयात भरती होते. त्यांची ऑक्सिजन पातळी 60 […]

अधिक वाचा
critical covid patients saved after oxygen

ऑक्सिजनअभावी ५०० रुग्णांचे प्राण धोक्यात असतानाच घडले असे काही…

दिल्ली : रेमडेसिवीरसोबतच ऑक्सिजनचा होणारा तुटवडा अनेक राज्यांसाठी चितेंची बाब ठरली आहे. राजधानी दिल्लीत ५०० कोरोना रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयात ऑक्सिजन संपल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. वेळ हातातून निघून चालली असतानाच ऑक्सिजनचा टँकर पोहोचला आणि सर्वांना दिलासा मिळाला. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात ऑक्सिजन संपत आला असल्याचं सांगितल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा
Deputy Chief Minister Ajit Pawar

मोठा निर्णय – किराणा दुकाने आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार; ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर उपलब्धतेबाबत महत्वाची बैठक

मुंबई : राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (व्हीसीद्वारे), वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींसह […]

अधिक वाचा
health minister rajesh tope

महाराष्ट्रात रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

‘महाराष्ट्रात जे काही ऑक्सिजन उत्पादित करणारे प्लांट आहेत, त्यात उत्पादन होणाऱ्या ऑक्सिजनपैकी ८० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा अन्य उद्योगांना होत होता, तर केवळ २० टक्केच ऑक्सिजनचा पुरवठा मेडिकलसाठी केला जात होता. आता त्यात बदल करून एकूण ऑक्सिजन उत्पादनाच्या ८० टक्के पुरवठा आता मेडिकलसाठी व २० टक्के पुरवठा उद्योगांसाठी करावा, असे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा