IPL २०२१ : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील सातवा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व ऋषभ पंत तर राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहेत. दिल्लीच्या संघाने चेन्नईविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेला सुरुवात केली होती. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार सॅमसनने उत्कृष्ट खेळी करत शतक झळकावले होते, मात्र तरीही त्यांनी सामना गमावला होता.




