कोरोना

आता तीन पेक्षा अधिक करोना रुग्ण आढळून आल्यानंतरच पूर्ण इमारत सील केली जाणार

मुंबई महापालिकेनं करोना रुग्ण आढळून येणाऱ्या बिल्डिंग सील करण्याच्या नियमात बदल केला आहे. “एका बिल्डिंगमध्ये जर तीन किंवा त्यापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून आले, तर महापालिका प्रशासनाकडून संपूर्ण बिल्डिंग सील केली जाईल. तीन पेक्षा कमी रुग्ण असतील, तर महापालिका अधिकाऱ्यांकडून संबंधित मजला सील केला जाईल. बिल्डिंगमधील इतर रहिवाशांवर बाहेर ये-जा करण्यावर कसलीही बंधन असणार नाही,” अशी माहिती महापालिकेच्या आर दक्षिण वार्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबई महापालिकेनं पश्चिम उपनगरात एक रुग्ण आढळून आलेल्या बिल्डिंगही सील करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला नागरिकांना आक्षेप घेतला होता. एक रुग्ण आढळून आलेल्या बिल्डिंगमधील रहिवाशांच्या हालचालींवर १४ दिवसांसाठी निर्बंध घालण्याला नागरिकांनी विरोध केला होता. त्यानंतर महापालिकेकडून नियमात बदल करण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत