5 children seriously injured due to lightning strike
महाराष्ट्र

अंगावार वीज पडल्यामुळे 5 मुलं गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील दत्तापूर येथे 5 मुलं अंगावार वीज पडून गंभीर जखमी झाली. अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे भिजण्यापासून वाचण्यासाठी ही मुलं झाडाखाली थांबली होती. परंतु, दुर्दैवाने ते ज्या झाडाखाली थांबले होते, तिथेच वीज पडल्यामुळे ही मुलं गंभीर जखमी झाली. या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस तालुक्यात दत्तापूर येथे ही मुलं बकऱ्या घेऊन शेतात गेले होते. यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. भिजण्यापासून वाचण्यासाठी ही पाचही मुलं एका झाडाखाली उभी राहिली. मात्र, यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत पाचही मुलं गंभीर जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच, जखमी मुलांच्या कुटुंबियांनी मुलांकडे जाऊन तात्काळ मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत