महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवार २१ मार्च रोजी होणार आहे. आयोगाने संकेतस्थळावर यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. उमेदवारांना १४ मार्च २०२१ च्या परीक्षेसाठी जी प्रवेशपत्रे जारी केली होती, त्याच प्रवेशपत्रांच्या आधारे २१ मार्चच्या परीक्षेला प्रवेश देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० शनिवारी २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० रविवार ११ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या दोन्ही परीक्षा नियोजित वेळेतच घेतल्या जातील, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.




