If a woman is beaten by her in laws, her husband is responsible for her injuries - Supreme Court
देश

महिलेला सासरी मारहाण झाल्यास तिच्या जखमांसाठी पतीच जबाबदार – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे कि, सासरी महिलेला कुटुंबीयांकडून मारहाण झाली तर तिच्या जखमांसाठी तिचा पतीच जबाबदार असेल. गेल्या वर्षी जून महिन्यात एका महिलेनं लुधियाना पोलिसांत पती आणि सासरच्या व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. हुंड्याची मागणी पूर्ण करू न शकल्याने पती, सासरे आणि सासू यांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप महिलेनं केला होता. या प्रकरणात महिलेच्या पतीला अटकपूर्व जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयानं यापूर्वी आरोपी पतीला अटकपूर्व जामीन नाकारला होता. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं या महिलेच्या पतीला कठोर शब्दांत फटकारलं. खंडपीठानं म्हटलं कि, “तुम्ही कशा पद्धतीचे पुरुष आहात? पत्नीच्या आरोपानुसार गळा दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तसंच जबरदस्तीनं गर्भपात करण्यात आला. पत्नीला क्रिकेटच्या बॅटनं मारहाण करणारे तुम्ही पुरुष आहात.”

यावर वकील महाजन यांनी म्हटलं की आरोपीनं नाही तर त्यांच्या पित्यानं महिलेला बॅटनं मारहाण केली होती. यावेळी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली खंडपीठानं म्हटलं, ‘यामुळे कोणताही फरक पडत नाही की कथितरित्या मारहाण करणारा पती होता की पिता… जेव्हा एखाद्या महिलेचा सासरच्या घरी छळ होतो तेव्हा मुख्य रुपात ही जबाबदारी पतीची आहे. सर्वोच्च न्यायालयानं आरोपी पतीचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.

काय आहे प्रकरण ?

१२ जून २०२० रोजी रात्री ९.०० वाजल्याच्या सुमारास पती आणि त्याच्या पित्यानं क्रिकेटच्या बॅटनं महिलेला मारहाण केली होती. त्यानंतर पतीनं पत्नीचा गळा दाबून तिची हत्या करण्याचाही प्रयत्न केला. त्याच्या पित्यानं महिलेच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेला रस्त्यावर फेकून दिलं. घटनेची माहिती मिळताच महिलेचे वडील आणि भाऊ यांनी तिथे येऊन महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सासरच्या घरी याआधीही झालेल्या मारहाणीमुळे दोन वेळा गर्भपात झाल्याचं महिलेनं म्हटलं आहे. महिलेच्या मेडिको लीगल रिपोर्टनुसार, तिच्या शरीरावर १० गंभीर जखमा होत्या. तिच्या चेहऱ्यावर-डोक्यावर, योनिवर आणि गळ्यावरही जखमा होत्या. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, १० पैंकी ८ जखमा या धारदार शस्त्रामुळे झाल्या होत्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत