कोरोना संसर्गामुळे अजूनही बरेच लोक ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. अशा परिस्थितीत, तुमचा इंटरनेटचा वापर जास्त होतो. तसेच आजकाल बरेचजण इंटरनेटचा वापर करत असतात. त्यामुळे बऱ्याच ग्राहकांना चांगल्या रिचार्ज ऑफरची प्रतीक्षा असते. जेणेकरून कमी खर्चात चांगला मोबदला मिळेल. अशातच आता रिलायन्स जिओ तुमच्यासाठी एक चांगली योजना आणत आहे. रिलायन्स जिओच्या या योजनेत आपण एकदा रिचार्ज करून ११ महिने या योजनेचा लाभ मिळवू शकता.
कंपनी या योजनेत 336 दिवसाची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. ज्यामध्ये ग्राहकांना बर्याच गोष्टींचा फायदा मिळणार आहे. जिओच्या 1,299 रुपयांच्या रीचार्ज योजनेची वैधता 336 दिवसांपर्यंत आहे. तुम्हाला हे रिचार्ज करायचं असेल तर Jio च्या वेबसाइटवर तुम्हाला ही योजना ‘others’ या कॅटेगिरीत मिळेल.
मिळणारे फायदे :
- या प्रीपेड प्लॅनच्या ग्राहकांना एकूण 24 जीबी डेटा ऑफर केला आहे.
- युझर्सना जिओ अॅप्समध्येही प्रवेश मिळतो.
- कॉल करण्यासाठी, Jio-to-Jio आणि इतर सर्व नेटवर्कसाठी देखील विनामूल्य कॉलिंगचा लाभ दिला जात आहे.
- या प्लॅनमध्ये 3600 एसएमएस विनामूल्य उपलब्ध आहेत.
- अमर्यादित व्हॉईस कॉल
- एकदा रिचार्ज करून ११ महिने विनामूल्य कॉलिंग आणि डेटा वापरू शकता.




