New guidelines for social media and OTT platforms
देश

ब्रेकिंग : सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता असणार करडी नजर, ‘या’ आहेत नवीन गाईडलाईन्स

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज वेबसाइट्ससाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. ते म्हणाले की सोशल मीडियाच्या गैरवापराविरोधात तक्रारींचे निराकरण ठराविक वेळेत करण्यासाठी कंपन्यांना विशिष्ट यंत्रणा बनवावी लागेल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ग्राहकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल आणि त्याचे नावही सांगावे लागेल. या अधिका्याला 15 दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण करावे लागेल. आपण एखाद्या सोशल मीडिया युझर्सचे कन्टेन्ट काढू इच्छित असल्यास, त्याचे कारण सांगावे लागेल. प्रथम कोणी चुकीचा कन्टेन्ट टाकला आहे, हे देखील सांगावे लागेल.

रविशंकर प्रसाद म्हणाले, “आमच्याकडे तक्रार आली होती की सोशल मीडिया हे गुन्हेगार, दहशतवादी, हिंसाचार करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे व्यासपीठ बनले आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे 50 कोटी वापरकर्ते आहेत. फेसबुकचे 41 कोटी तर इंस्टाग्राम वापरकर्त्यांची संख्या 21 कोटी आणि ट्विटरचे दिड कोटी वापरकर्ते आहेत. या सोशल मीडियाचा दुरुपयोग आणि फेक बातम्यांच्या तक्रारी आल्या आहेत. ही चिंतेची बाब होती. त्यामुळे सरकारने अशा प्लॅटफॉर्मसाठी गाईडलाईन्स तयार करण्याचा निर्णय घेतला.”

सोशल मीडियासाठी तयार केलेल्या गाईडलाईन्स :

  1. युझर्सच्या तक्रारींसाठी सोशल मीडिया कंपन्यांना अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल आणि त्याचे नावही नमूद करावे लागेल.
  2. या अधिका्याला 15 दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण करावे लागेल. न्यूडतेच्या बाबतीत तक्रारी असल्यास, 24 तासांच्या आत त्यासंबंधित कन्टेन्ट काढावा लागेल.
  3. या कंपन्यांना किती तक्रारी आल्या आणि त्यांच्यावर काय कारवाई झाली याचा दरमहा अहवाल सादर करावा लागतो.
  4. 24 तासांच्या आत तक्रारीकडे लक्ष द्यावे लागेल आणि 15 दिवसांच्या आत निराकरण करावे लागेल.
  5. प्रथम अफवा किंवा चुकीची माहिती कोणी दिली आहे, ते शोधावे लागेल.
  6. जर कोणी भारताच्या बाहेरून एखादा चुकीचा कन्टेन्ट पोस्ट केला तर प्रथम असे ट्विट किंवा सामग्री कोणी अपलोड केलं, हे सांगावे लागेल.
  7. आपण एखाद्या सोशल मीडिया वापरकर्त्याची सामग्री काढू इच्छित असल्यास, त्यामागचे कारण आपल्याला सांगावे लागेल.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत