MP Navneet Rana threatened to throw acid
महाराष्ट्र

ब्रेकिंग : खासदार नवनीत राणा यांना अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, धमकीचे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवर?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली आहे. हे धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर असल्यामुळे या प्रकाराची दखल घत नवनीत राणा यांनी शिवसेनेनं धमकी दिल्याचा आरोप करत दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीजबिल अशा अनेक मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे, तसेच या सर्व मुद्द्यांवर न्याय देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांना एक धमकीचे एक पत्र आले आहे. या पत्रात त्यांच्यावर अ‌ॅसीड फेकण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारची दखल घेत त्यांनी दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नवनीत राणा यांना आलेले धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर असल्यामुळे राणा यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले आहेत. या पत्रात अर्वाच्य भाषेचा वापर करण्यात आला आहे. तसेच ही धमकी शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर पाठविण्यात आल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. दरम्यान, हे पत्र शिवसेनेच्या खऱ्या लेटरहेडवर असल्याची कोणतीही पुष्टी अजून झालेली नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत