In the case of Pooja Chavan's suicide, the BJP directly attacked the Shiv Sena leader
महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात थेट शिवसेनेच्या नेत्याचे नाव घेत भाजपचा हल्लाबोल

मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. मात्र काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट एका मंत्र्याचे नाव घेत आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ वाढलं, तिचे मंत्र्यांसोबतचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

पूजा चव्हाण ही तरुणी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी परळी वैजनाथ येथून पुण्यात आली होती. पुण्यातील वानवडी भागात ती वास्तव्याला होती. मात्र ८ फेब्रुवारीला पूजाने इमारतीतून उडी घेऊन आत्महत्या केली. तिने तणावातून हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात होते. मात्र, याप्रकरणातल्या १० ते १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या क्लिपमध्ये ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांचं संभाषण असल्याचा मुद्दा उचलत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. मात्र चित्रा वाघ यांनी थेट नाव घेत शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या कि, ‘पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी जे काही अपडेट्स समोर येत आहेत, ते पाहता याचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे पोलिसांनी आता स्यु-मोटो दखल घेत तक्रार नोंदवून घ्यायला हवी व मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा’, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. पूजा चव्हाण प्रकरणात मोबाइलमधील संभाषणाचा मोठा पुरावा समोर आला आहे. त्यात तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्यापासून तिने आत्महत्या केल्यावर तिचा मोबाइल ताब्यात घेण्याची सूचना संजय राठोड यांनी अरुण नावाच्या व्यक्तीला दिली. या क्लिप सगळ्यांनी ऐकल्या आहेत. अशावेळी पोलीस आणखी कोणत्या पुराव्याची वाट पाहत आहेत. कदाचित पूजा चव्हाणच्या कुटुंबावर दबाव असू शकेल, पण पोलिसांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर कारवाई करायला हवी. मात्र, या सर्वासाठी राजकीय इच्छाशक्तीही तितकीच महत्त्वाची आहे. हे काम मुख्यमंत्र्यांचे आणि गृहमंत्र्यांचे आहे. त्यांनी संबंधितांच्या मुसक्या आवळायला सांगायला हवे. एवढे पुरावे असून ते कसली वाट पाहत आहेत?

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत