मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबतची माहिती लपवली. प्रतिज्ञापत्रातील माहिती आणि प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी केली असता ती पूर्णसत्य नाही, याबाबत चौकशी करावी, अशी तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयकर विभागाकडे सोमवारी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे. त्यांनी दडवलेल्या संपत्तीबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच आयकर विभागाचे महासंचालक भानुमती यांची भेट घेऊन ठाकरे यांच्या संपत्तीबाबत तक्रार केली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. ठाकरे यांनी संपत्तीचे खरेदी मूल्य चार कोटी ३७ लाख दाखवले आहे. करारामध्ये बाजारमूल्य चार कोटी १४ लाख रुपये आहे. तर खरेदी मूल्य दोन कोटी दहा लाख रुपये दिसून येते. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अलिबाग जवळील जमिनीवरील बंगल्यांच्या संपत्तीचे बाजारमूल्य पाच कोटी २९ लाख रुपये आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
I had 40 minutes discussion with Smt M V Bhanumathi DG Investigation ( Income Tax) on Concealment of Land/Properties by Shri Uddhav Thackeray Family. I submitted complaint & evidences (17 annexures 100 pages) Requested Investigation & Action@BJP4India @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/uScOgNpkBb
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 8, 2021




