Gang rape of 80 year old woman
देश

संतापजनक : ८० वर्षांच्या वृद्धेवर सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील खरेला गावातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. ८० वर्षांच्या एका वृद्धेवर घरात कुणीही नसताना सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, ८० वर्षांची ही वृद्ध महिला २ फेब्रुवारी रोजी आपल्या घरात एकटीच होती. वृद्धेच्या कुटुंबातील सदस्य घराला बाहेरून कुलूप लावून गावात सुरू असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गेले होते. यावेळी वृद्धेवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला. वृद्धेनं ओरडा-ओरड करू नये यासाठी तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता. या प्रकारानंतर वृद्धेच्या नातीनं पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला, पोलिसांनी फुल्लू उर्फ फूलचंद्र तसंच आणखी एका अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपस करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत