Prime Minister Modi will be vaccinated against corona in the second phase of vaccination
कोरोना देश

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी कोरोना लस घेणार

केंद्र सरकारने आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री लस टोचून घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. यानंतरच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी लस टोकून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरु होणार, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पन्नासीच्या पुढच्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यामुळे पन्नाशीच्या पुढील सर्व खासदार आणि आमदारांना कोरोनाची लस टोचण्यात येणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान मोदी आणि इतर नेते लस टोचून घेणार आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत