Important suggestions regarding 'Shakti' Act from women and lawyers associations in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील महिला व वकील संघटनांकडून शक्ती कायद्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना

मुंबई : शक्ती कायद्यासंदर्भात विधानभवन येथे संयुक्त समितीसमोर मुंबईतील विविध महिला संघटना तसेच वकील संघटनांकडून महत्त्वपूर्ण सूचना व निवेदने प्राप्त झाली असून समितीच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होईल, असे या संदर्भातील समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबईतील जवळपास 46 महिला व वकील संघटनांकडून सूचना, निवेदने प्राप्त झाली होती. त्यांच्या प्रतिनिधींनी समितीसमोर सूचना मांडल्या. या समितीची पुढील बैठक औरंगाबाद येथे दि. 30 जानेवारी, 2021 रोजी होणार असून त्याठिकाणीदेखील महिला व वकील संघटनांकडून सूचना व निवेदने स्वीकारली जाणार असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

या बैठकीस उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, अपर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे व इतर सदस्य उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत