gym
पुणे महाराष्ट्र

महापालिकेने दसऱ्यानिमित्त नागरिकांना दिली खूशखबर

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने दसऱ्यानिमित्त नागरिकांना खूशखबर दिली आहे. आजपासून व्यायामशाळा खुल्या होणार आहेत आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उपाहारगृहे, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार यांना सकाळी आठ ते रात्री साडेअकरापर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मात्र, क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश द्यावा, असे या आदेशामध्ये नमूद केले आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना किमान पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. सुरक्षित अंतराच्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असून त्यासाठी महापालिकेची विविध पथके तपासणी करणार आहेत.

शहरातील व्यायामशाळा दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरु करण्यास परवानगी देण्याचे राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार व्यायामशाळा सुरू करताना आरोग्य खात्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी, असे महापालिकेने आदेशामध्ये नमूद केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत