A bomb blast in Kabu
ग्लोबल

काबूलमध्ये शैक्षणिक केंद्राबाहेर बॉम्बस्फोट, १८ जण ठार, ५७ जखमी

काबूल : काबूलमध्ये शनिवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १८ जण ठार, तर शाळकरी विद्यार्थ्यांसह ५७ जण जखमी झाले. काबूलच्या पश्चिम भागातील दश्त-ए-बर्ची या शियाबहुल परिसरातील शैक्षणिक केंद्राबाहेर हा स्फोट झाला. हल्लेखोर या केंद्रात शिरण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवले असता त्याने स्फोट घडवून आणला, असे अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक अरियन यांनी सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसून, तालिबानने या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये एका शैक्षणिक केंद्रात झालेल्या अशाच प्रकारच्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी आयसिसशी संलग्न एका संघटनेने स्वीकारली होती. या हल्ल्यात ३४ विद्यार्थी ठार झाले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत