Dr. Somnath Gite being felicitated by Maharashtra Minister Madhuri Misal for his contribution to de-addiction awareness and social work in Maharashtra
पुणे महाराष्ट्र राजकारण व्यसनमुक्ती

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांचा सत्कार करण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हा सत्कार मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते पार पडला. त्या महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्यांक विकास विभागाच्या राज्यमंत्री तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या हस्ते झालेला हा सन्मान डॉ. गिते यांच्या व्यसनमुक्ती क्षेत्रातील दीर्घकालीन, प्रभावी आणि समाजहितकारी कार्याची महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.

या प्रसंगी डॉ. गिते यांच्या कार्याचा गौरव करताना मान्यवरांनी सांगितले की, त्यांनी व्यसनमुक्ती जनजागृती, युवक प्रबोधन या क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. राज्यभरातील हजारो युवक, पालक व नागरिकांपर्यंत व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचविला आहे.

डॉ. गिते यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेत त्यांना “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” प्रदान केला होता. हा राज्यस्तरीय सन्मान मा. संजय शिरसाट यांच्या हस्ते देण्यात आला होता. या पुरस्कारामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ व प्रेरणा मिळाली आहे.

डॉ. गिते यांच्या कार्याबाबत राज्यपालांसह विविध सामाजिक संस्था, मान्यवर व लोकप्रतिनिधींनीही प्रशंसापत्रे व शिफारसपत्रांच्या माध्यमातून पाठिंबा दर्शविला आहे. त्यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त असून सामाजिक कार्याशी संबंधित अनेक जागतिक विक्रम त्यांच्या नावावर नोंदवले गेले आहेत. तसेच त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मानही प्राप्त झाले आहेत.

सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी डॉ. गिते यांच्या व्यसनमुक्ती चळवळीतील समर्पित कार्याचे कौतुक करत, समाजात व्यसनमुक्त, सुसंस्कारित आणि सशक्त पिढी घडविण्यासाठी त्यांचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे जावे, अशा शुभेच्छा दिल्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत