Mirzapur Train Accident: Six Pilgrims Killed While Crossing Tracks Near Chunar Railway Station
देश

भीषण अपघात! रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्याने सहा भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : मिर्झापूर येथे रेल्वे रुळ ओलांडताना झालेल्या दुर्दैवी अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात सुमारे सहा लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हे सर्वजण चोपानहून वाराणसीकडे गंगेत पवित्र स्नानासाठी निघाले होते. अपघाताची घटना चुनार रेल्वे स्थानकाजवळ घडली. हे सर्व प्रवासी चुनारमधील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर चोपन-प्रयागराज पॅसेंजर ट्रेनमधून उतरले होते. त्यानंतर रुळ ओलांडत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेल्वेगाडीने त्यांना धडक दिली.

या भीषण घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे. मृतदेह ओळखण्याचे काम सुरु असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत