अहिल्यानगर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे महाराष्ट्र मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ऐतिहासिक बैठकीत विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरण विषयक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिस्थळाच्या जतनासाठी ६८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, एकूण ५५०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या योजनांची घोषणा या बैठकीत झाली.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय:
- अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती
– मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट शासनामार्फत तयार केला जाणार
– चित्रपटासाठी लागणारा खर्च अर्थसंकल्पीय तरतुदीतून करण्यात येणार
– महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ हे कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार - ‘आदिशक्ती अभियान’ – महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम
– महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांवर जनजागृती
– बालविवाहमुक्त समाज, लिंगभेद निर्मूलन, हिंसामुक्त कुटुंब, शासकीय योजनांचा लाभ
– उत्कृष्ट अभियान राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आदिशक्ती पुरस्कार’
– योजनेसाठी 10.50 कोटींचा निधी मंजूर - ‘यशवंत विद्यार्थी योजना’ – धनगर समाजासाठी विशेष शिक्षण योजना
– १०,००० विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण
– यापूर्वी 288.92 कोटींचा निधी वितरित
– योजना राजे यशवंतराव होळकर यांच्या नावाने राबविली जाणार - ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’
– मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे
– प्रत्येक वसतिगृहात २०० विद्यार्थ्यांची क्षमता (100 मुलं, 100 मुली)
– पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, नवी मुंबई, संभाजीनगर येथे उभारणी - जलसंवर्धनासाठी विशेष योजना
– अहिल्यादेवींनी उभारलेल्या तलाव, घाट, विहिरी, कुंडांचे सर्वेक्षण व जतन
– ३४ जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, सुशोभिकरण
– यासाठी ७५ कोटी रुपये मंजूर - नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय
– अहिल्यानगरमध्ये १०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय
– संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय
– ४८५.०८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित - ५५०३.६९ कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखडे
– अहिल्यादेवी स्मृतिस्थळ: 681.32 कोटी
– अष्टविनायक मंदिर जिर्णोद्धार: 147.81 कोटी
– तुळजाभवानी: 1865 कोटी, महालक्ष्मी: 1445.97 कोटी, ज्योतीबा: 259.59 कोटी
– त्र्यंबकेश्वर: 275 कोटी, माहुरगड: 829 कोटी - महिलांसाठी नवीन आयटीआय अहिल्यानगर येथे सुरु होणार
- राहुरी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय
- ‘मिशन महाग्राम’ कार्यक्रमाचा कालावधी २०२८ पर्यंत वाढविण्यात येणार
– ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (VSTF) अंतर्गत योजना - नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासाठी अध्यादेश-2025 जारी
या ऐतिहासिक निर्णयांमुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची स्मृती जतन होण्यासोबतच राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.




