सोलापूर : आज सकाळी सुमारे ११ वाजून २२ मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र सांगोला तालुक्यात जमिनीपासून ५ किमी खाली असल्याचे समजले आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, काहींनी घराच्या बाहेर धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतीही मोठी हानी झालेली नाही, परंतु जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पुढील अपडेटसाठी अधिकृत सरकारी माहितीची प्रतीक्षा केली जात आहे. सोलापूर आणि आसपासच्या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असले तरी, सुदैवाने मोठ्या नुकसानीची किंवा हानीची माहिती मिळालेली नाही.
EQ of M: 2.6, On: 03/04/2025 11:22:07 IST, Lat: 17.41 N, Long: 75.21 E, Depth: 5 Km, Location: Solapur, Maharashtra.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjcVGs @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/DYZgG9zlg2— National Center for Seismology (@NCS_Earthquake) April 3, 2025




