पुणे महाराष्ट्र

पुणे : मामाने भाच्याला चाकूने भोसकून ठार मारले, किरकोळ वादातून भयंकर कृत्य

पुणे : किरकोळ वादातून १५ वर्षीय भाच्याला त्याच्या मामाने चाकूने भोसकून ठार मारले. शुक्रवारी रात्री सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. त्यानंतर पसार झालेल्या मामाला सिंहगड पोलिसांनी अटक केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गजानन गजकोश (वय १५, रा. धारावी, कोळीवाडा, मुंबई) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मेघनाथ अशोक तपासे (वय ४१, रा. मानाजीनगर, नऱ्हे) याला अटक करण्यात आली. याबाबत आरोपी मेघनाथचा मेहुणा मंगेश दत्तात्रय ओव्हाळ (वय ३१, रा. कृष्णाईनगर, मानाजीनगर गणपती मंदिराजवळ, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन हा मामा मेघनाथ याच्याकडे राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी रात्री त्याचा मामाच्या मुलाशी वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात मेघनाथने भाचा गजाननला पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर चाकूने त्याच्या छातीवर वार केला. चाकूने भाेसकल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. गंभीर जखमी झालेल्या गजाननला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी भेट दिली.

रात्री उशिरा आरोपी मेधनाथला अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, आरोपीने किरकोळ वादातून त्याच्या भाच्याचा चाकूने वार करून खून केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत