क्राईम देश

संतापजनक! धावत्या रुग्णवाहिकेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गुन्ह्यात पीडितेची बहीण आणि मेहुण्याचा सहभाग

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 16 वर्षीय मुलीवर धावत्या रुग्णवाहिकेत बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ‘108’ आपत्कालीन सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेत घडली, यातील चार आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत वाहन चालकाचाही समावेश आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी तिची बहीण आणि मेव्हण्यासोबत रुग्णवाहिकेतून प्रवास करत होती. त्यापैकी कोणीही रुग्ण नव्हते. रुग्णवाहिकेत या तिघांव्यतिरिक्त चालक आणि त्याचा सहकारी होते. रुग्णवाहिकेचा चालक पीडित मुलीची बहीण आणि मेहुण्याच्या ओळखीचा होता. प्रवासादरम्यान, पीडित मुलीची बहीण आणि तिचा मेहुणा वाटेत पाणी आणण्याच्या बहाण्याने वाहनातून खाली उतरले. त्यानंतर या जोडप्याची वाट पाहण्याऐवजी रुग्णवाहिका चालकाने वेग वाढवला. नंतर ड्रायव्हरसोबत प्रवास करत असलेला तिचा सहकारी राजेश केवट याने एका निर्जन गावात चालत्या रुग्णवाहिकेत तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीला रात्रभर ओलीस ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही आरोपींनी तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले. त्यानंतर घरी पोहोचल्यावर पीडितेने घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. पीडित मुलीने तिची बहीण आणि मेव्हण्यावरही या गुन्ह्यात मदत केल्याचा आरोप केला आहे.

पीडितेच्या आईकडून पोलिसांत तक्रार करण्यास विलंब
पीडित मुलीच्या आईने या घटनेमुळे समाजात कुटुंबाची प्रतिमा मलिन होईल या भीतीने दोन दिवस पोलिसांशी संपर्क साधला नाही. अखेर 25 नोव्हेंबर रोजी मुलगी आणि तिची आई पोलिसांकडे गेली, त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून केवटसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडितेची बहीण आणि मेहुणा फरार
रुग्णवाहिका चालक वीरेंद्र चतुर्वेदी आणि कथित बलात्कारी केवट यांना बुधवारी अटक करण्यात आली. मुलीची बहीण आणि मेहुणा यांना पकडण्यासाठी शोध सुरू करण्यात आला आहे, त्यांच्यावर गुन्हा घडवून आणल्याचा आरोप आहे. सर्व आरोपींवर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि भारतीय न्यायिक संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत