पुणे : पुण्यातील नऱ्हे येथील अंबामाता मंदिराजवळील “परफेक्ट ऑटो गॅरेज” येथे 4 चारचाकी आणि 6 दुचाकी अशा एकूण दहा वाहनांना आग लागली. दरम्यान, अग्निशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले.
पाच ते सात गाड्यांच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटलेल्या आढळल्या आहेत. त्यामुळे, आगीचे कारण आणि तोडफोडीचा देखील पोलीस तपास करत आहेत.




