rhea chackraborty
मनोरंजन

एनसीबीकडून रिया चक्रवर्तीला अटक

एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. एनसीबी च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने चौकशीदरम्यान ड्र्ग्स घेतल्याचं कबूल केलं आहे. सुशांत आणि त्याच्या मित्रांसोबत अनेकदा ड्रग्स घेतल्याचंही तिने मान्य केलं आहे. अटकेनंतर आता रियाची मेडिकल टेस्ट केली जाणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गेल्या तीन दिवसांपासून एनसीबी रियाची सतत चौकशी करत होती. सध्या एनसीबी कार्यालयाच्या बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याची कोव्हिड चाचणी केली जाते. त्यासाठी रियाला सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे.

पुरावे मिळाल्यानंतर रियाला अटक करण्यात आली आहे, असं बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे. रियाचे ड्रग्स माफियांसोबत संबंध असल्याचंही उघड झालं आहे. रिया सराईत गुन्हेगार नसल्याने तिला रिमांडची गरज नाही, असं एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत