crime
पुणे महाराष्ट्र

भयंकर! प्रेमात अडसर ठरणाऱ्या चिमुकल्याची आई आणि तिच्या प्रियकराकडून हत्या

पुणे : प्रेमात अडसर ठरणाऱ्या चार वर्षाच्या मुलाचा आई आणि तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड महिन्यापूर्वी हा मुलगा त्याच्याच आईने आणि तिच्या प्रियकराने केलेल्या भयंकर गुन्ह्याला बळी पडला. हत्या झालेल्या मुलाचे नाव चुटक्या शंकर पवार (वय 4) असून त्याची आई रेणू शंकर पवार (वय 20) आणि तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके (वय 21 ) या दोघांना जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्यांनी मृत मुलाचे प्रेत पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील भुलेश्वर घाटात फेकून दिले. ही घटना दीड महिन्यापूर्वी घडली होती. जेजुरी पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोडलिंब येथे राहणारे रेणू पवार आणि उमेश साळुंके यांच्यात प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या या मुलाचा दोघांनी दीड महिन्यांपूर्वी गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत साडीत गुंडाळून दुचाकी गाडीवर नेऊन ते पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटात फेकून दिले. या बाबत रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी तपास करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी घाटात फेकून दिलेल्या चिमुकल्याच्या प्रेताचे अवशेष देखील शोधून काढले.

या भीषण घटनेत सहभागी असलेल्या दोन्ही व्यक्तींविरुद्ध रीतसर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे तपास करीत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत