Youth Died While Trekking At Tail Bail Fort In Pune
पुणे महाराष्ट्र

ट्रेकिंग करताना 200 फूट खाली कोसळून पुण्यातील तरुणाचा मृत्यू

पुणे : पुण्यातल्या मुळशी आणि मावळ तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या तैल-बैल गडावर रविवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. तैल-बैल गडावर ट्रेकींग करत असताना रोप तुटल्याने २०० फूट खाली कोसळून एका ट्रेकर्सचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमनाथ बळीराम शिंदे (वय २५) असे मृत पावलेल्या ट्रेकर्सचे नाव आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ हा त्याच्या नऊ मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी तैल-बैल गडावर गेला होता. चढाई करत असताना बांधलेला रोप अचानक तुटल्यामुळे तो खाली २०० फूट दरीत कोसळला. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. सोमनाथ हा पुण्यातील कात्रज परिसरातील रहिवासी होता. त्याला आधीपासून ट्रेकिंगची आवड होती. सोमनाथचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत