kishori pednekar
महाराष्ट्र मुंबई

किरीट सोमय्यांचा किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप, मुलाचेही घोटाळे बाहेर काढणार!

मुंबई : SRA घोटाळ्यावरून शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. आज पुन्हा एकदा सोमय्यांनी पेडणेकर यांनी गाळे हडप केले असल्याचा पुराव्यासह आरोप केला आहे. तसंच पेडणेकर यांच्या मुलाचे घोटाळे सुद्धा बाहेर काढणार असा इशारा दिला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून एसआरए घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. किशोरी पेडणेकर यांना पुन्हा दादर पोलिसांनी मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. खोटे काही केले नाही तर मग कुलूप घेवून दुकाने घरं, बंद करायला निघाला आहात. तर मग चौकशीला समोरे का जात नाही, असा सवाल सोमय्यांनी केला.

पुढच्या चार दिवसात मी किशोरी पेडणेकरांच्या मुलाचे परदेशात काय उद्योग आहे. हे सांगणार आहे. हे प्रकरण खूप मोठे आहे. मोबाईलचा सीडीआर आहे. त्या का घाबरत आहेत. आणखी अशा चार एसआरएमध्ये त्यांनी घोटाळे केले आहेत, असा आरोपही सोमय्यांनी केला. मी सर्व एजन्सीजना पुरावे दिले होते. निर्मल नगर पोलीस, मुख्यमंत्री कार्यालय सगळीकडे मी पुरावे दिले होते पण त्यावेळी मुख्यमंत्री यांनी दबाव आणला होता. सहा ठिकाणी किशोरीताईच्या विरोधात चौकशी चालू आहे. मी आता पुन्हा सतीश लोखंडे यांच्याशी बोललो त्यांनी तपास सुरू केला आहे. अर्धा डझन ठिकाणी चौकशी सुरू आहे. त्यात कंपनी मंत्रालय, मुंबई ॲाफेन्स वींकने करावी अशी माझी मागणी आहे, असंही सोमय्या म्हणाले.

‘माझ्या मागणीचा ते स्वीकार करतील असा माझा विश्वास आहे. किशोरी पेडणेकर यांच्या मुलाने पुराव्यासोबत खाडाखोड केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी जी नौटंकी केली. पुढल्या वर्षीच्या दादासाहेब फाळके अवार्ड त्यांना दिला पाहिजे, असा टोलाही सोमय्यांनी लगावला. ‘संजय अंधारी याला एसआरएचा फ्लॅट मिळाला. त्याला एसआरए फ्लॅट दिला. किशोरी पेडणेकर आणि क्रीश कॅार्पोरेटने कंपनी मंत्रालयाली लिव्ह लासन्ससवर दिला. या दोन्ही सह्या वेगवेगळ्या आहेत. त्यात जमीन आसमानचे अंतर आहे. यातला खरा संजय अंधारी कोण आहे. हे खरं शोधून काढा, अशी मागणीही सोमय्यांनी केली.

किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नाही तर त्यांचा भाऊ सुनिल कदम आहे. हे मी नाही सांगत आहे तर या स्वत: सांगत आहे. सुनिल कदम कोविड काळात गेला आहे. या नौटंकी करत आहे. मृत भावाला अशी भाऊबीज देत आहात? मीडियाला सांगता किरिट सोमय्या तर माझा भाऊ आहे. लाज वाटली पाहिजे की, तुम्ही अशा पद्धतीने आपल्या मृत भावाच्या नावे घोळ करता, अशी टीकाही सोमय्यांनी केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत