ओडिशा : ओडिशातील बालासोर येथील एका कारखान्यात अमोनिया गॅस गळतीमुळे 28 मजूर आजारी पडले, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. गॅस गळतीमुळे आजारी पडलेल्या कामगारांमध्ये बहुतांश महिला आहेत. बालासोर येथील प्रॉन प्रोसेसिंग प्लांटच्या युनिटमध्ये बुधवारी (28 सप्टेंबर) हा अपघात झाला.
मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. जुलालसेन जगदेव यांनी सांगितले की, कांतापारा येथील स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्रात 28 जणांना दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 15 जणांना बालासोर येथे रेफर करण्यात आले आहे. आतापर्यंत फक्त सात मजुरांना बालासोर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले आहे, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे आणि तीन जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.




