first case of monkeypox; Check symptoms, treatment of rare disease
देश

दिल्लीत मंकीपॉक्सचा 7 वा रुग्ण आढळला, मंकीपॉक्स कसा पसरतो? जाणून घ्या…

दिल्ली : दिल्लीत सोमवारी मंकीपॉक्सचा सातवा रुग्ण आढळला आहे. यासह, आता देशातील मंकीपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या 12 वर पोहोचली आहे. दिल्लीत नोंदवण्यात आलेल्या या 7व्या प्रकरणात, संक्रमित रुग्ण ही 24 वर्षीय नायजेरियन महिला आहे. पीडित महिलेला मंकीपॉक्स संसर्गाची लक्षणे दिसू लागल्यानंतर तिला दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाचणीचे नमुने पुण्यातील ICMR-NIV च्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. चाचणीच्या रिपोर्टनुसार महिलेला मंकीपॉक्सची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, रुग्ण महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. तिला मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी बनवलेल्या खास वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. वृत्तानुसार, ही महिला चार महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून परतली होती. तेव्हापासून ती दिल्लीतील शारदा विहार येथे राहत होती. ताप, घसा खवखवणे, दुखणे, लाल पुरळ येऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या लोकनायक रुग्णालयात मंकीपॉक्सचे २ रुग्ण उपचार घेत आहेत. तर 5 रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

मंकीपॉक्स कसा पसरतो?
मंकीपॉक्समुळे सामान्यतः ताप, थंडी वाजून येणे, पुरळ आणि चेहऱ्यावर किंवा गुप्तांगांवर फोड येतात. तसेच संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने किंवा त्याचा प्रसार होतो. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने, लैंगिक संबंध ठेवल्याने किंवा त्याने वापरलेल्या वस्तू वापरल्याने हा आजार पसरण्याचा धोकाही असतो.

मार्गदर्शक सूचना :
मंकीपॉक्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि लोकांना जागरूक करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काय करावे आणि काय करू नये याची यादी जारी केली आहे. मंकीपॉक्स टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये हे यातून स्पष्ट होते.

काय करावे?

  • मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाने विलगीकरणात राहावे.
  • जर तुम्ही संक्रमित व्यक्तीच्या आसपास असाल तर मास्क घाला आणि हातमोजे वापरा.
  • आपले हात साबणाने किंवा सॅनिटायझरने धुत रहा.
  • जंतुनाशक वापरा

काय करू नये?

  • मंकीपॉक्सच्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कोणाशीही तुमचे टॉवेल, चादरी किंवा कपडे शेअर करू नका.
  • संक्रमित व्यक्तीच्या कपड्यांबरोबर आपले कपडे धुवू नका
  • मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला किंवा सभेला जाऊ नका.
  • चुकीच्या माहितीच्या आधारे लोकांना घाबरवू नका.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत