गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी रोजी विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते. पाकिस्तानी एअरफोर्स विरूद्धच्या कारवाईत भारतीय पायलट अभिनंदन यांचे ‘मिग २१’ क्रॅश झाले होते. तेव्हा त्यांनी पॅराशूटने उतरुन आपला जीव वाचवला, परंतु ते पाकिस्तान मध्ये लॅन्ड झाले. पाकिस्तानी सैन्याने त्यांना तिथे ताब्यात घेतले. परंतु नंतर भारताची आक्रमकता पाहून त्यांनी माघार घेतली आणि 1 मार्च रोजी अभिनंदन यांना अटारी-वाघा सीमेवरून भारतात परत पाठवले.
या प्रकरणात बुधवारी पाकिस्तान मुस्लिम लीग-एन (पीएमएल-एन) नेते अयाज सादिक यांनी पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये स्पष्ट केलं की, परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तेव्हा झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत म्हटले होते कि, जर अभिनंदन यांना सोडलं नाही, तर भारत रात्री 9 वाजेपर्यंत हल्ला करेल.
सादिक यांनी विरोधी नेत्यांना सांगितले की, कुरेशी यांनी PPP, PML-N आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यासह इतर नेत्यांसमवेत या विषयावर बैठक घेतली होती. ते पुढे म्हणाले कि, मला आठवते की या बैठकीदरम्यान लष्करप्रमुख बाजवा कक्षात आले होते, त्यावेळी त्यांचे पाय थरथर कापत होते आणि त्यांना घाम फुटला होता. इम्रान खान यांनी बैठकीस येण्यास नकार दिला होता. परराष्ट्रमंत्री बैठकीत लष्करप्रमुखांना म्हणाले होते, अभिनंदनला भारतात परत जाऊ द्या, अन्यथा भारत हल्ला करेल. (अल्लाह के वास्ते अभिनंदन को जाने दो, नहीं तो भारत हमला कर देगा।)
भारताचे माजी हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस. धानोआ म्हणाले, “आम्ही अभिनंदनच्या वडिलांना सांगितले होते की आम्ही त्याला नक्की परत आणू.” ते (पाकिस्तान नेते) असे म्हणत आहेत कारण आमची सेना आक्रमक होती. आम्ही त्यांचे (पाकिस्तान) फॉरवर्ड पोस्ट उध्वस्त करण्यास तयार होतो. त्यांना आमची क्षमता माहित आहे. ‘