Four arrested for Kidnapping for ransom
पुणे महाराष्ट्र

पुणे : स्वारगेट स्टँन्ड येथून 6 वर्षीय मुलीचे अपहरण, 12 तासांत आरोपी पोलीसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यात एका 6 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत स्वारगेट पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या चिमुकलीला घेऊन पसार झालेल्या आरोपींना पोलीसांनी 12 तासामध्ये जेरबंद केले आहे. स्वारगेट स्टँन्ड येथुन कोणीतरी अज्ञात इसमाने 6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपह्यत मुलीस घेवुन आरोपी चिखली ता. मोहोळ, जि. सोलापुर येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तपास पथकाचे पोलीस अंमलदार मुकुंद तारु, फिरोज शेख, किरण भरगुडे, दिपक खेंदाड व संदीप घुले यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले आणि अपह्यत मुलीची सुटका करण्यात आली. त्यानंतर या चिमुकलीला सुखरुप तिच्या बहिणीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याप्रकरणी रेश्मा समीर शेख (वय ३०, रा. मु. पो. पेणुर, ता. मोहोळ, जि. सोलापुर व जैन मंदीर,पाण्याचे टाकी शेजारी, कात्रज, पुणे) आणि वैशाली पोशटी शिंदे (कोहीनुर कॉलनी, राधाराम टॉकी जवळ, कवठा रोड, वसमत जि. हिंगोली व भिवऱ्या मॉल गणपती मंदीर जवऴ, क्रांतीनगर, ता. मोहोळ, जि. सोलापुर) या दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत